Baramati News

Baramati News । बारामतीच्या मानपेचात मानाचा तुरा! सातासमुद्रापार निर्यात होणार केळी आणि पेरू, अपेडाने घेतला पुढाकार

बातम्या

Baramati News । राज्यात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. हल्ली शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती (Modern Farming) करत आहेत. ज्याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होत आहे. आधुनिक पद्धतीने केलेल्या शेतीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक लाभ होत आहे. शेतीला चालना देण्यासाठी विविध योजनांची सुरुवात करत असते. अशात आता बारामतीकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे.

Irrigation Department । मोठी बातमी! पोटवितरिका फोडून पाणी सोडल्याने पवारांवर गुन्हा दाखल

सातासमुद्रापार निर्यात होणार केळी आणि पेरू

आता बारामती मधील पेरूची निर्यात संयुक्त अरब अमिरातीला तर बारामती मधील केळ्यांची निर्यात (Fruit export) नेदरलँड, सौदी अरेबिया आणि रशियाला होणार आहे. (Banana and Guava Export) देशातील शेतकरी उत्पादन संस्था या कृषी मालाचे एकीकरण करणाऱ्या अग्रणी संस्था म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे पुरवठा साखळीत एक महत्वाची भूमिका बजावतानाचा शेतकऱ्यांना कार्यक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असल्याने या संस्थांच्या क्षमता बांधणीत अपेडा सक्रियपणे सहभागी होत आहे.

Gram Rate । नवा हरभरा खातोय ‘इतका’ भाव, जाणून घ्या नवीनतम दर

अपेडाने थेट निर्यात सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करत पाच वर्षांच्या कालावधीत ११९ शेतकरी उत्पादक संस्था (FPO) आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे निर्यातदारांमध्ये रूपांतर केले असून अपेडाने नोव्हेंबरमध्ये नेदरलँडला तर जानेवारी महिन्यामध्ये रशियाला समुद्रमार्गे केलेली केळ्यांची निर्यात हा यातील एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

Narendra Modi | मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याच्या तयारीत, बड्या नेत्याच्या आरोपामुळे खळबळ

दरम्यान, केळी, आंबा, डाळिंब आणि इतर ताजी फळे आणि भाजीपाला यांसारख्या वस्तूंच्या निर्यातीत वाढ होण्यासाठी सागरी प्रोटोकॉलची अंमलबजावणी केली असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचा सहभाग आणखी वाढणार आहे. अपेडाने उत्पादने जास्तीत जास्त नवनवीन ठिकाणी निर्यात करण्याच्या दृष्टीने खूप उपाययोजना देखील आखल्या आहेत.

Success Story । दाम्पत्याने मारली नोकरीवर लाथ, अनोख्या पद्धतीने शेळीपालन करून वर्षाला होतेय लाखोंची कमाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *