Baramati Doodh Sangh । मागील काही दिवसांपासून दुधाचे दर (Milk Price) कमालीचे कमी झाले आहेत. पशूंचा चारादेखील खूप महाग झाला आहे. एकंदरीतच पशुपालनाचा व्यवसाय तोट्यात आला आहे. जर हे दर असेच घसरत (Milk Price Falls Down) चालले तर पुन्हा एकदा राज्याचे वातावरण तापू शकते. बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना बोनस दिला आहे.
त्यामुळे शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. बोनसमुळे शेतकरी आणि कामगार हितासाठी संघ कटिबद्ध असल्याचे मत संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे आणि उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे. या संघाचे कामकाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. या दूध संघाचे दररोज सुमारे २ लाख ७० हजार लिटर दूध संकलन होते.
KVP Scheme । शेतकऱ्यांसाठी खास योजना! गुंतवणूक केल्यास मिळेल दुप्पट परतावा, जाणून घ्या
तसेच २०२२-२३ या आर्थिक वर्षात गायीच्या दुधाला सरासरी प्रतीलिटर ३४ रुपये ५३ पैसे एवढा उच्चांकी दर मिळाला आहे. तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संघाच्या कायम कर्मचाऱ्यांना तीन पगार म्हणजे २५ टक्के बोनस दिला आहे. म्हणजे एकूण १ कोटी ५७ लाख रुपये कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर संघामार्फत सर्व प्राथमिक दूध संस्थांना पशुवैद्यकीय सेवा-सुविधा, आयुर्वेदिक उपचार पद्धत, प्रशिक्षण, मुरघास प्रशिक्षण देण्यात येते.
Dhananjay Munde । आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा! मिळणार संसार उपयोगी साहित्य किट
या ठिकाणी होते विक्री
बारामती संघाचे पॅकिंग दूध नंदन ब्रँडने वेगवेगळ्या शहरांमध्ये विक्री होत असून दूध नाशिक, शिर्डी, पुणे, मालेगाव, मुंबई, छ. संभाजीनगर, लातूर, रोहा, महाड, सोलापूर या विविध शहरांमध्ये विक्री केले जात आहे. तसेच वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांना, त्यात मदर डेअरी दिल्ली, कॉफी डे, ताज हॉटेल, ग्रँड हयात हॉटेल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, हिंदुजा हॉस्पिटल, मंत्रालय, कोकण भवन आणि बीच कॅन्डी हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी संघाच्या नंदन दुधाची विक्री केली जाते.
MS Dhoni । धोनीकडे आहे ‘या’ लोकप्रिय कंपनीचा ट्रॅक्टर, ज्यामुळे शेतीची कामे होतात सोपी