Bank Loan । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ कामासाठी बँक ऑफ महाराष्ट्र देणार लाखांचे कर्ज

बातम्या
Bank Loan

Bank Loan । सध्याच्या काळात जवळपास सर्वांचे बँकेत खाते (Bank Account) असते. गुंतवणुकीवर जास्त व्याजदर उपलब्ध करून देणाऱ्या बँकेकडे ग्राहकांचा कल असतो. प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांसाठी काही ना काही सुविधा उपलब्ध करून देत असते. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) या बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होईल. (Farmer loan from Bank of Maharashtra)

Sorghum Market । शेतकऱ्यांना अच्छे दिन! पांढऱ्या ज्वारीला मिळतोय हंगामातील सर्वात जास्त भाव

मिळेल लाखांचे कर्ज

बँक ऑफ महाराष्ट्रकडून शेतकऱ्यांसाठी विविध कर्जाच्या योजना राबवल्या जात असून शेतकऱ्यांना आता टू व्हीलर किंवा थ्री व्हीलर खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. (Farmer loan) हे लक्षात घ्या की वाहनांच्या किमतीच्या पंचवीस टक्के एवढी रक्कम तसेच आरटीओ शुल्क शेतकऱ्यांना सुरवातीला भरावे लागेल. ज्याला तुम्ही डाऊन पेमेंट म्हणू शकता.

LPG Cylinder । सर्वसामान्यांना निवडणुकीची भेट, आजपासून एलपीजी सिलिंडरचे दर इतक्या रुपयांनी झाले कमी

डाऊन पेमेंट भरल्यानंतर कमाल 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना मिळेल. मंजूर झालेल्या कर्जासाठी एक वर्षाचा एमसीएलआर + 3.15%P.A. व्याजदर द्यावे लागेल. या योजनेअंतर्गत 1.60 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी वाहनाचे हायपोथेकेशन करण्यात येईल. 1.60 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाच्या रक्कमेसाठी वाहनाचे हायपोथेकेशन आणि जमीन गहाण/तृतीय पक्षाची हमी घेतली जाईल. कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक हप्ते भरून कर्जाची परतफेड करता येईल.

Paddy Compensation । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार २५ लाख रुपये

पात्रता

शेतकरी, कुक्कुटपालन, पशुपालन, रेशीम उत्पादन अशा इतर शेतीशी निगडित व्यवसायांमध्ये गुंतलेले लोक यासाठी पात्र असतील. अर्जदार शेतकऱ्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असावा. अर्जदाराचे वय किमान 18 आणि कमाल 70 वर्षे वयोगटातील असावे. अर्जदार शेतकऱ्याचे किमान दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्न असावे. तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागेल.

Drought In Maharashtra । दुष्काळाची अशी ही दाहकता! चोरट्यांनी मारला चाऱ्यावर डल्ला

येथे करा अर्ज

कर्जासाठी शेतकऱ्यांना https://digiloans.bankofmaharashtra.in/apply/farmervehicleloan?bom या लिंक वर जाऊन शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे.

Land Rule । आनंदाची बातमी! तुकडेबंदी कायद्यातील बदलामुळे १ ते ५ गुंठे जमिनीची करता येणार खरेदी-विक्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *