Bank Loan

Bank Loan । शेती कर्जाचे पुनर्गठन करायचंय? तातडीने करा हे काम, बंद होईल कर्ज वसुलीची कटकट

बातम्या

Bank Loan । ऊस, कापूस, मका, कांदा, गहू, हरभरा यांसारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात भारतात घेतले जाते. परंतु, या पिकांना प्रत्येक वर्षी अपेक्षित हमीभाव मिळतोच असे नाही, त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. आर्थिक तंगीमुळे अनेक शेतकरी बँकेकडून कर्ज घेतात. अनेकांना कर्ज फेडणे शक्य होत नाही, वेळेत कर्ज न फेडल्याने शेतकरी नाइलाजाने टोकाचा निर्णय घेतात.

Pipeline Subsidy । आता पाईपलाईनसाठी मिळेल 50% अनुदान, जाणून घ्या कसा आणि कुठे करावा अर्ज?

दरम्यान, पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची लागवड केली आहे. परंतु सततचा खंड आणि सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे खरीप वाया गेला आहे. त्याशिवाय रब्बीच्या पेरण्या एकूण क्षेत्राच्या अवघ्या ५२ टक्केच क्षेत्रावर झाल्या असून सुरवातीला सॅटेलाईटवरील सर्व्हेत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला आणि बार्शी या पाच तालुक्यातच दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

Unseasonal Rain | धक्कादायक! अवकाळी पावसाने पाचशे ते सहाशे कोटींच्या कांद्याचे नुकसान

बॅंकांकडून शेती कर्जाचे पुनर्गठन सुरू

या वाढीव महसूल मंडळांना वीज सवलत, शेतसाऱ्यात सवलत, कर्ज वसुलीला स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन (Restructuring of Farm Loans) अशा एकूण आठ सवलती लागू असतील. आता जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांकडील कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. बॅंकांकडून शेती कर्जाचे पुनर्गठन (Farm Loan) सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आता संमतिपत्र द्यावे लागेल. त्याशिवाय पुनर्गठन होणार नाही, असे बॅंकांनी स्पष्ट केले आहे.

Havaman Andaj । विदर्भासह ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

द्यावे लागणार संमतिपत्र

आता संबंधित शेतकऱ्याच्या संमतीशिवाय शेती कर्जाचे पुनर्गठन केले जाणार नाही. ज्यांना कर्जाची परतफेड करणे जमणार नाही, त्या शेतकऱ्यांना बॅंकेत जाऊन संमतिपत्र लागणार आहे. जेणेकरून कर्ज थकबाकीत जाणार नाही किंवा पुढे त्यांच्याकडे बॅंका कर्ज वसुलीसाठी तगादा लावणार नाहीत. या नवीन आदेशामुळे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Buffalo Rearing । पशुपालकांची होणार चांदी! मुऱ्हा नाही तर ‘या’ जातीची म्हैस देते 500 लिटर पर्यंत दूध

कोरडवाहू जमिनीसाठी हेक्टरी साडेआठ हजार, बागायती जमिनीसाठी हेक्टरी 17 हजार रुपये तसेच बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 22 हजार 500 रुपयांची मदत मिळणार आहे. परंतु, अजूनही या शेतकऱ्यांना भरपाई कधीपर्यंत वितरित होणार याबाबत निर्णय झाला नाही. त्याशिवाय हवामान यंत्र नसल्याने जिल्ह्यातील 9 महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर झाला नव्हता.

Electricity । कधीच होणार नाही वीजपुरवठा खंडित! शेती आणि गावासाठी मिळणार विजेची स्वतंत्र लाईन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *