Banana Crop Insurance

Banana Crop Insurance । केळी विमा प्रश्न तापला; आंदोलन होणार…

बातम्या

Banana Crop Insurance । जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. मात्र शेतकऱ्यांना फळपीके घेताना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. यामधीलच एक संकट मध्ये मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला होता. या अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावेळी सरकारने पीक विम्यातून नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही जिल्ह्यात फळ पिक विमा योजनेतून परतावा मिळालेला नाही.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील 48 तासांसाठी राज्याच्या ‘या’ ठिकाणी ‘मौसम मस्ताना’; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

जळगाव जिल्ह्यात फळ पिक विमा योजनेत ऑक्टोबर 2022 मध्ये सहभागी झालेल्या 77 हजार 800 शेतकऱ्यांना परतावे मिळाले नाहीत. त्यामुळे प्रशासन याबाबत योग्य माहिती देत नसून ठोस निर्णय घेत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे आता मंगळवारी म्हणजेच आज रावेर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात केली उत्पादक व विमाधारक शेतकरी मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Raju Shetti । साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टी यांचा गंभीर इशारा

शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत आणि ज्या काही मागण्या आहेत त्याबाबत जळगाव येथे जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना शेतकरी निवेदन देणार आहेत. शासन पुन्हा एकदा ३७ हजार हेक्टर एवढ्या केळी पिकासाठी विमा संरक्षित पडताळणी करणार आहे मात्र ही पडताळणी करणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. कारण आता अनेक शेतकऱ्यांचे केळी पीक क्षेत्रातून काढणी होऊन कुठलेही अवशेष नाहीत.

Soybean Rate । सोयाबीनला आज किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

नऊ महिन्यांचा केळी पिकाचा विमा संरक्षण कालावधी ३१ जुलै २०२३ रोजी संपला असून यानंतर 45 दिवसात विमाधारकांना परतावे देणे अपेक्षित होते. मात्र अजूनही कोणत्याच शेतकऱ्यांना याचे परतावे मिळाले नाहीत. सप्टेंबर महिना संपला तरी देखील परतावे मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Havaman Andaj । सावधान! राज्यातील 15 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट; उद्या कशी असेल पावसाची स्थिती?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *