Apple Farming

Apple Farming । नादच खुळा! आठवी पास व्यक्तीने केली सफरचंदाची शेती; उच्चशिक्षित लोकांपेक्षा कमावतोय जास्त पैसे; जाणून घ्या कस केलं नियोजन?

यशोगाथा

Apple Farming । चांगला अभ्यास करून यश मिळवलेले लोक आपल्याकडे बरेच आहेत. आपण अशी अनेक उदाहरण पाहिली असतील. पण देशात असे काही लोक आहेत ज्यांनी यशाच्या मार्गात शिक्षणाची कमतरता येऊ दिली नाही. अशीच एक कहाणी हिमाचल प्रदेशातील राम गोविंद या शेतकऱ्याची आहे, ज्यांचे सुरुवातीचे शिक्षण केवळ आठवीपर्यंत झाले होते आणि आज ते आपल्या मेहनतीने सफरचंदाची शेती करून एक यशस्वी शेतकरी बनले आहेत. (Apple Farming)

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 । शेतीला तार कुंपण करण्यासाठी सरकार देतयं 90% अनुदान; असा करा अर्ज

शेतीची सुरुवात

राम गोविंद सांगतात की, ते त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठे आहेत आणि त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना अभ्यासात अजिबात रस राहिला नाही. अशा परिस्थितीत सुरुवातीला त्यांनी वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याचा विचार केला आणि लहानपणीच त्यांनी आईला सफरचंद शेतीमध्ये मदत करण्यास सुरुवात केली आणि नंतर हळूहळू त्यांना या दिशेने त्यांना यश मिळू लागले. (Success Story)

Havaman Andaj । पुढील 24 तासांत ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज

राम गोविंद सांगतात की त्यांच्याकडे एकूण 4 एकर जमीन आहे आणि या शेतात ते 2 एकरमध्ये सफरचंद आणि 2 एकरमध्ये विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करत असत. दरम्यान, त्यांना त्यांच्या मित्राकडून कृषी विज्ञान केंद्राबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तेथे जाऊन सफरचंदाच्या उत्तम जातीची माहिती घेतली. यानंतर त्यांनी आपल्या आईसोबत संपूर्ण चार एकर जमिनीत सफरचंदाच्या नवीन जातीच्या बियाण्यांसह लागवड करण्याचा निर्णय घेतला.

Water Supply With Tanker । राज्यातील 2 हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा; समोर आली धक्कादायक आकडेवारी

राम गोविंद सांगतात की, त्यांना सुरुवातीला खूप अडचणींचा सामना करावा लागला. जसे की या नवीन जातीच्या बियाण्यांना किती वेळा पाणी द्यावे लागेल, कोणत्या प्रकारची जमीन सुपीक राहील आणि किती खतांचा वापर करावा लागेल. अशा परिस्थितीत त्यांना कृषी विज्ञान केंद्रातून प्रत्येक समस्येवर उपाय मिळत असे, त्यामुळे त्यांचे काम अधिक सोपे झाले. आणि सध्या त्यांची यशस्वी शेतकऱ्यांमध्ये गगना केली जात आहे.

Abdul Sattar । मोठी बातमी! कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कडक कारवाई; अब्दुल सत्तार यांचे आदेश

कमाई

राम गोविंद सांगतात की ते दरवर्षी 25 ते 30 लाख रुपये कमावतात. त्यांनी पिकवलेले सफरचंद देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत. आपल्या यशाचे श्रेय तो त्यांच्या आईला देतात. ‘[

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *