Animals Subsidy Scheme

Animals Subsidy Scheme । आता बिनधास्त पाळा घोडे, गाढव; सरकार देतंय 50 लाखांपर्यंतचं अनुदान

शासकीय योजना

Animals Subsidy Scheme । केंद्र आणि राज्य सरकारच्या अशा अनेक योजना (Govt Scheme) आहेत ज्यांचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. देशभरातील करोडो शेतकरी या सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. सरकारची अशीच एक योजना आहे, या योजनेअंतर्गत सरकार 50 लाखांपर्यंतचं अनुदान (Subsidy Scheme) देत आहे. आता तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Success Story । युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! एक हेक्टर भाजीपाल्यातून होतेय लाखोंची कमाई

2012 आणि 2019 च्या राष्ट्रीय पशु जनगणनेच्या आकडेवारीतून देशातील घोडे, गाढव आणि उंट या पशुधनाची संख्या खूप कमी होत चालली आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जातिवंत घोडे, गाढव आणि उंट यांचा राष्ट्रीय पशुधन मिशन योजनेअंतर्गत समावेश केला आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. (Subsidy Scheme For Animals)

Agriculture News । शेताच्या बांधावर कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या तज्ञांचं मत

त्यावेळी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना या तिन्ही प्राण्यांचे पालन करण्यासाठी अनुदान मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर जारी केलेल्या माहितीनुसार, एखादा व्यक्ती किंवा शेतकरी उत्पादक कंपनी राष्ट्रीय पशुधन मिशन योजनेअंतर्गत घोडे, गाढव आणि उंट पालनाचा व्यवसाय करत असल्यास आता त्याला सरकारकडून व्यवसायासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

Central Govt । ब्रेकिंग! केंद्र सरकारचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

मिळणार 50 लाखांपर्यंतचं अनुदान

या सरकारी अनुदानाची ही रक्कम ५० लाखांपर्यंत असेल. जर तुम्हाला १ कोटी रुपये भांडवलातून या प्राण्यांचे संगोपन करायचे असेल तर सरकार तुम्हाला ५० लाखांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देईल. देशातील चाऱ्याचा तुटवडा पाहता या प्राण्यांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना चाऱ्याचे बियाणे, चाऱ्याशी निगडित मशिनरी, चारा साठवणूक व्यवस्थेसाठी अनुदान देण्यात येईल.

Baramati News । बारामतीच्या मानपेचात मानाचा तुरा! सातासमुद्रापार निर्यात होणार केळी आणि पेरू, अपेडाने घेतला पुढाकार

राज्य सरकारसाठी लागू असेल योजना

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व राज्य सरकारसाठी ही योजना लागू असेल. समजा एखादे राज्य सरकार जातिवंत घोडे, गाढव आणि उंट यांच्या उत्तम प्रजाती निर्माण करण्यासाठी काम करत असल्यास केंद्र अशा राज्य सरकारांना त्यासाठी मदत करेल. जसे एखादे राज्य सरकार घोडे, गाढव आणि उंटांच्या संरक्षणासाठी वीर्य बँक किंवा प्रजनन केंद्र उभारत असल्यास राज्य सरकारला १० कोटींपर्यंतची मदत मिळेल. सर्व शेतकरी आणि तरुण व्यवसायिकांना तीन पैकी एका प्राण्याचे पालन करून व्यवसाय उभारायचा असल्यास त्यांना ५० टक्के भांडवल स्वतः किंवा बँकेच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात उपलब्ध करावे लागेल.

Irrigation Department । मोठी बातमी! पोटवितरिका फोडून पाणी सोडल्याने पवारांवर गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *