Animal Insurance

Animal Insurance । अवघ्या तीन रुपयांत मिळणार पशुविमा, लवकरच येणार मंत्रिमंडळात प्रस्ताव

पशुसंवर्धन

Animal Insurance । भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात अनेक पिकांचे उत्पादन घेण्यात येते. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. परिणामी त्यांच्यावर अनेकदा आर्थिक संकट देखील उभे राहते. अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal Husbandry ) करतात. पशुपालकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.

Sonalika Tractor । शक्तिशाली इंजिनसह सोनालिकाने लॉन्च केले पाच ट्रॅक्टर, पहा लिस्ट

पशुसंवर्धन विभागाने आता एक रुपयात पीक विमा योजनेच्या धर्तीवर एक नवीन योजना (Insurance Scheme) आणली आहे. या योजनेमध्ये पशुपालकांना केवळ तीन रुपयांमध्ये जनावरांचा विमा उतरवता येणार आहे. पशुसंवर्धन विभाग यासंदर्भात प्रस्ताव तयार करत आहे. लवकरच तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर त्याचा पशुपालकांना फायदा होईल.

Lucky Cow । काय सांगता? एका गायीने बदलले कर्जबाजारी कुटुंबाचे नशीब, कसा झाला चमत्कार? जाणून घ्या

दीड लाख जनावरांची मर्यादा नसेल

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत २०१४ पासून पशुविमा योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत वर्षांला दीड लाख जनावरांचा विमा आणि अंदाजे ९ हजार दाव्यांची भरपाई देण्यात येते. या हप्त्याचा भार ४० टक्के केंद्रावर, ३० टक्के राज्यावर तसेच ३० टक्के लाभार्थ्यांवर असतो. आता या प्रस्तावित योजनेत दीड लाख जनावरांची मर्यादा नसणार आहे.

Crop Insurance । सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातही मिळणार १ रुपयात पीक विमा

तीन रुपये खर्च

त्यामुळे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त पाच जनावरांचाच विमा उतरवता येईल. एका जनावराचा विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्याला तीन रुपये खर्च येईल. यामुळे राज्याच्या तिजोरीवर किती आर्थिक बोजा पडेल याची माहिती सादर करण्याचे आदेश पशुसवंर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहेत.

Havaman Andaj । ढगाळ हवामान कायम! उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *