Animal husbandry । राज्यातील शेतकऱ्यांवर यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे बिकट वेळ आली आहे. यंदा पावसाने ऐन पावसाळ्यातच (Rain in Maharashtra) अनेक भागात पाठ फिरवली होती. त्यामुळे राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस वेळेत न पडल्याने अनेक पिके जळून गेली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱ्याची मागणी जास्त असल्याने चाऱ्याच्या किमती महाग झाल्या आहेत.
E-Peak Inspection । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी सवलतींसाठी ई-पीक पाहणी अनिवार्य
जनावरांना बाजारात मिळतोय कवडीमोल दर
इतकेच नाही तर दुधाचे दर (Milk rate) देखील खूप कमी झाले आहेत. शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडत नाही. नाइलाजाने शेतकरी जनावरे विकत आहेत. पण जनावरे विकतानाही त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. एकेकाळी गजबजलेला जनावरांचा गोठा ओस पडला आहे. शेतकऱ्यांवर यामुळे मोठे आर्थिक संकट आले आहे.
Sugarcane FRP । एफआरपी कितीही वाढवला तरी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार
धक्कादायक बाब म्हणजे शेतकऱ्यांना एक लाखांना घेतलेली बैलांची जोडी चाऱ्याअभावी आता ७० हजारांना (Animal rates) विकावी लागत आहे. जरी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली जात असली तरी त्यांना कोणी खरेदी करत नाहीत. असे असल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना मागेल त्या भावात विकावे लागत आहे. सध्या जरी शेतीची कामे संपली असली तरी पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी रक्कम मोजून व्यापाऱ्यांकडून जनावरे पुन्हा खरेदी करावी लागतील.
Drought Condition । सरकार दुष्काळ निवारणीसाठी उचलणार ठोस पाऊल, अजितदादांचे आश्वासन
- हिरव्या चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून दुग्ध व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळतो. पण आता हा व्यवसाय धोक्यात आला आहे.
- माणसांप्रमाणेच जनावरे आणि वन्य जिवांची होरपळ होत असून पाणी, चाऱ्याअभावी पशुपालक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
- यंदा परिसरातील शेतकऱ्यांना दुबार हंगाम घेता न आल्याने चाराटंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्याच्या भाववाढीने पशुपालक मेटाकुटीला आला आहे. पण व्यापाऱ्यांची मात्र चांदी होत आहे.
Jowar Rate । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ज्वारीची आवक वाढताच दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर