Animal husbandry । अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करतात. कारण या व्यवसायातून प्रचंड नफा मिळवता येतो. जर तुम्हाला उत्तम नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे. अनेकजण म्हशीचे पालन करतात. जर तुम्ही उत्तम दर्जाच्या म्हशीच्या जातीचे संगोपन केले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. नाहीतर तुम्हाला आर्थिक झळ बसेल.
Vegetables Price Hike । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भाजीपाल्यांच्या किमतीत कमालीची वाढ
सध्या अनेक म्हशीच्या जाती (Breeds of buffaloes) आहेत. तुम्ही कोणत्याही जास्त दूध देणाऱ्या म्हशीच्या जातीचे संगोपन करू शकता. हरियाणामध्ये अशी एक म्हैस आहे जिची किंमत (Buffaloes Price) जाणून तुम्हालाही नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. हि आलिशान कारपेक्षा महाग म्हैस (Expensive buffalo) आहे. या किमतीत तुम्ही सहज 2 BHK फ्लॅट खरेदी करू शकता.
Milk Rate । शेतकऱ्यांना पुन्हा धक्का! खासगी-सहकारी दूध संघांकडून गाईच्या दूध दरात ‘इतकी’ कपात
धर्मा म्हैस
हरियाणामध्ये आलिशान कार फॉर्च्युनरपेक्षा महाग असणाऱ्या चांगल्या जातीच्या महागड्या म्हशी शेतकरी पाळत आहेत. येथील भिवानी जुई गावात राहणाऱ्या व्यक्तीकडे धर्मा नावाची म्हैस असून तिचे वय 35 वर्षे इतके आहे. एखाद्या लहान मुलाप्रमाणे या व्यक्तीने या म्हशीला वाढवले आहे. धर्मा 15 लिटर दूध देत आहे.
Sim Card । सावधान! तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत? ‘या’ पद्धतीने जाणून घ्या नाहीतर..
46 लाखांची म्हैस
किमतीचा विचार केला तर धर्माची किंमत 46 लाख रुपये इतकी आहे. महत्त्वाचे म्हणजे ही व्यक्ती आपल्या म्हशीची ६१ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत विक्री करणार नाही. धर्माच्या जन्मापासून म्हशीला हिरवा चारा, चांगले धान्य आणि 40 किलो गाजर खायला घालत आहे. इतकेच नाही तर धर्मा म्हशीने आजूबाजूच्या जिल्ह्यांसह पंजाब आणि यूपीमध्ये सौंदर्यात अनेक पदके मिळवली आहेत.
PM Kisan Yojana । धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’ चा लाभ
61 लाखांपेक्षा जास्त किमतीत होणार विक्री : पशुवैद्य
क्षेत्रीय पशुवैद्य हृतिक असा दावा करतात की, “धर्मा सौंदर्याच्या बाबतीत म्हशींची राणी आहे. ती म्हैस कमी पण हत्तीचे बाळ आहे. धर्मा ही हरियाणा राज्यातील म्हशींची उत्तम जात असावी. महत्त्वाचे म्हणजे धर्मा 61 लाख रुपयांना नाही तर त्यापेक्षा जास्त किंमतीला विकली जाईल”.
Agriculture News । काय सांगता! 12 वर्ष शेतकऱ्याने पायात घातली नाही चप्पल, केला होता संकल्प
या देखील आहेत महाग म्हशी
पशुसंवर्धन क्षेत्रात हरियाणा हे आघाडीचे राज्य आहे. येथील अनेक म्हशीच्या किमती लाखोंच्या घरात आहे. यात सरस्वती आणि रेश्मा म्हशींचा समावेश आहे. हिसारमधील बुडखेडा येथील नरेश यांच्या मुराह जातीच्या रेश्मा म्हशीची किंमत 45 लाखांच्या पुढे गेली आहे. तर लितानी येथील सुखबीरकडे सरस्वती नावाच्या म्हशीची किंमत 51 लाख रुपये आहे.