Animal Care

Animal care । काँग्रेस गवत खाल्ल्यामुळे जनावरांवर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

पशुसंवर्धन

Animal care । आपल्याकडे अनेकजण शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत यामुळे शेतकरी जनावरांना जास्त प्रमाणात हिरवे शेतातील गावात खाऊ घालतात. मात्र गवत जनावरांना चारण्याआधी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही जनावरांना जर गवत खाण्यासाठी देत असाल तर यामध्ये काही गावात हे विषारी असते त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर याचा परिणाम देखील होऊ शकतो. विषारी वनस्पतींपैकी एक म्हणजे गाजर गवत त्याला आपण कॉंग्रेस गवत म्हणून पण ओळखतो. हे तण जनावरांनी खाल्ल तर जनावरांना विषबाधा होऊ शकते. याचा परिणाम म्हणजे दूधही कडू लागते मग आपल्या जनावरांन हे गवत खाल्लय हे कस ओळखायच ? आणि त्यावर काय उपाय करायचे हे आम्ही तुम्हाला काही तज्ज्ञांच्या मदतीने सांगत आहोत.

काँग्रेस परागकणांमुळे माणसांना आणि जनावरांना देखील विविध प्रकारची ॲलर्जी होते. काँग्रेस गवताचा कडवट व विशिष्ट असा घाण वास येतो. जर चुकून तुमच्या जनावराने हे गावात खाल्ले असेल तर तुम्ही ते कसे ओळखणार? जनावरांच्या खाण्यात जर कधी चुकून काँग्रेस गवत गेले तर तुमच्या जनावरांच्या अंगावर विविध ठिकाणी जखमा होऊन खपली बसते. मान व खांद्याच्या भागावरील केस जातात. त्वचा पांढरी पडते. पापण्या आणि चेहऱ्याच्या स्नायूभोवती खाज येते.

त्याचबरोबर जनावरांच्या अंगावर देखील सूज येते. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले आणि वेळेवर उपचार केला नाहीतर तुमचे जनावर दगावण्याची देखील शक्यता असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या गवताचा फक्त जनावरांनाच त्रास नाही तर मानवाला देखील याचा त्रास आहे. आता तुम्ही म्हणाल मानवाला याचा काय त्रास होतो? तर जनावराने जर काँग्रेस गवत खाल्ले आणि त्याच जनवरचे दूध आपण खाल्ले तर आपल्या आरोग्यावर देखील याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा जनवराच दुधही कडवट लागत.

त्यामुळे जनावराच्या चाऱ्यात काँग्रेस गवत येणार नाही याची पशुपालकांनी काळजी घेणे खूप गरजेचे जाते. बऱ्याचदा आपण काळजी घेऊनही जनावर हे गावात खातात. अशावेळी यावर काय उपाययोजना कराव्यात? याबाबत जाणून घेऊयात.

जनावराने काँग्रेस गवत खाल्ल्यास या उपाययोजना करा

जनावरांमध्ये जर विषबाधेची लक्षणे दिसून आली तर त्या जनावराला ताबडतोब पशुवैद्यकाला दाखवा. जनावराला तुळस, मेथी दाण्याचे पाणी पाजा. जनावराला थोड्या प्रमाणात लसूण खाऊ घालावा. लसूण खाण्यामुळे पोट दुखण्याची समस्या तसेच जुलाब कमी होतात. विषबाधा टाळायची असेल तर विषारी वनस्पती असलेल्या ठिकाणी जनावरे चरायला सोडू नका. जनावराला जास्त वेळ उपाशी ठेऊ नका. तुम्ही देखील चारा कापताना विषारी गवत चाऱ्यामध्ये आलं तरीही धोकाच आहे. त्यामुळं गवत कापताना लक्ष असू द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *