Agriculture News

धक्कादायक! अज्ञाताने शेतातील मोरबट्टीच्या गंजीला लावली आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

बातम्या

अक्कलकुवा तालुक्यातील खाई ग्रामपंचायत अंतर्गत ईराईबारीपाडा येथिल शिवारात तीन मोरबट्टीच्या गंजीला अनोळखी व्यक्तीने आग लावल्याने मोरबट्टी पिकासह चारा जळून खाक झाला. ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. खाई गावालगत ईराईबारीपाडा येथिल शिवारात शेतकऱ्यांनी डोंगर ,दरीखोऱ्यातुन गोळा केलेले वर्ष भराची कमाई काढण्यासाठी अथक मेहनत घेतली होती. डोंगराळ भागातील शेतातुन कालुसिंग उतऱ्या वसावे, विजा मारग्या वसावे, जोल्या राश्या वसावे या तिन्ही शेतकऱ्यांनी एका ठिकाणी तीन वेगवेगळे गंजी गोळा करुन ठेवल्या होत्या.

Rabi Crop Seed Subsidy । कामाची बातमी! रब्बी करिता हरभरा बियाण्यावर मिळतंय अनुदान, असा करा अर्ज

गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डोंगराळ भाग व सकाळी ची वेळ असल्यामुळे शेतकरी बेसावध असल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने आग लावली असल्याने खाई येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ऐन दिवाळीत हाताशी आलेले वर्ष भराच्या कामाईच्या धान्य व चारासह जळून खाक झाले यात शेतकऱ्यांचे जवळपास ५ ते ६ लाखाचे नुकसान झाले आहे.

LPG Cylinder । सर्वसामान्यांना दिलासा! सिलिंडरचे पुन्हा घसरले दर, जाणून घ्या नवीनतम किमती

खाई गावातील तिन्ही शेतकऱ्यांनी तळ हाताच्या फोडासारखे जपलेल्या पिक डोळ्यांदेखत पेट घेताना पाहून त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसंच, उभ्या शेतातील पिक जळल्याने कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अगोदरच शेतकऱ्यावर संकटाचे ढग घोंगावत असताना मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला.

Pm Kisan Tractor Yojana । शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार 15 लाख, जाणून घ्या योजना

या तीन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने संबंधित घटनेचा पंचनामा होणे आवश्यक होते. मात्र तलाठी यांना याबाबत कल्पना देखील घटनास्थळी भेट दिली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने झालेल्या नुकसान भरपाई तात्काळ द्यावी व अज्ञात आरोपीचा शोध घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अक्कलकुवा –धडगाव विधानसभा अध्यक्ष ॲड.रुपसिंग वसावे यांनी केली आहे.

Cyclone । राज्याला चक्रीवादळाचा धोका! ‘या’ राज्यांमध्ये पडणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *