Ambedkar death anniversary

Ambedkar death anniversary । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक विचार आजही ठरतात मार्गदर्शक; कोणते ते जाणून घ्या?

बातम्या

Ambedkar death anniversary । डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची दलितांचे कैवारी ही ओळख आहे. आज त्यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन (Dr. Babasaheb Ambedkar Death Anniversary) आहे. बाबासाहेब एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. ते पत्रकार, कृषितज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, उद्योगतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ होते. जाती आणि वर्णव्यवस्थेने गुलाम बनविलेल्या माणसांचा पहिला बोलका स्वर. कष्ट करणारा पंडित, विचार आणि विवेकाचा मिलाफ असणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब.

Farmers Suicide । आत्महत्येबाबत महाराष्ट्र अग्रेसर; धक्कादायक आकडेवारी आली समोर

इतकेच नाही तर त्यांनी शेतीच्या प्रश्नाविषयी मुलभूत अभ्यास केला होता. (Ambedkar agricultural thought) शेतीचे प्रश्न आणि त्यावर काय उपाययोजना कराव्यात, याविषयी त्यांनी केलेली मांडणी आजही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरते. १९४४ मध्ये बाबासाहेबांनी शेतीसाठी लागणारा खर्च सरकारने उचलावा, त्यासाठी रक्कम शेतकऱ्यांना द्यायला हवी, अशा सूचना केल्या होत्या. (Ambedkar agricultural opinion)

Agriculture electricity । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतीसाठी दिवसा मिळणार 12 तास वीज, फडणवीसांनी दिलं आश्वासन

ग्रामीण भाग हा देशाचा आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू आहे, असे सांगत त्यांनी शेतीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, हे पटवून दिले. हा विचार पुढे ठेवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी योजना, आंदोलनाच्या माध्यमातून शेतीबाबतचे आपला विचार मांडला. तसेच, त्यांनी अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे, असेही सांगितले.

Havaman Andaj । सावधान! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पडणार जोरदार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

शेतीसाठी आवश्यक त्रिसूत्री

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतीसाठी लागणारी अवजारे आधुनिक पाहिजे, पारंपरिक पद्धतीने केलेली शेती कधीच फायद्याची असणार नाही, आधुनिकीकरणासाठी जमिनीचे छोटे-छोटे तुकडे नाही तर एकत्रिकरण होणे खूप गरजेचे आहे. शेतीला दर्जेदार बियाण्याची गरज असल्याची त्रिसूत्री शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी महत्त्वाची आहे, असे बाबासाहेबांनी त्या वेळेस सांगितले होते.

Success Story । मानलं बुवा! शिक्षकाचा शेतीत यशस्वी प्रयोग, मिळवलं पेरूचं 24 लाखांचं उत्पादन

शेतीविषयक आंबेडकर यांचे विचार

शेतकऱ्यांचा संप

बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली 1927 साली कोकण प्रांत शेतकरी संघाची स्थापना करण्यात आली होती. पुढे 1929 रोजी रत्‍नागिरी येथे बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन केले. या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू करून शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आणला.

Inflation । सर्वसामान्यांना मोठा झटका! ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किमती

हा संप 1928-1934 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील चरी या गावात झाला. शेतकऱ्यांचा हा संप वर्ष 7 वर्ष सुरू होता. बाबासाहेबांनी 1936 मध्ये शेतकरी आणि कामगार यांच्या प्रश्नावर स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना केली. बाबासाहेबांनी याबाबत 1937 मध्ये विधेयक मांडले. 1938 मध्ये आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 25 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढला. लढा अधिक तीव्र झाल्यांनतर जमीनीवर शेतकऱ्यांना स्वतःचा हक्क मिळण्यासाठी, कुळ कायदा लागू करण्यासाठी कायदा बाबासाहेबांनी मंजूर करुन घेतला. अशा प्रकारे वंशपरंपरागत मजुरांसारखी जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काची जमीन मिळाली.

Supriya Sule । राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

सहकारी शेती

ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये लहान शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाढवल्या आणि त्या जमीनदारांना हस्तांतरित करण्यासाठी मुंबई विधानसभेत एक विधेयक मांडण्यात आले होते. शेती उत्पादक आहे आणि अनुत्पादक ही त्याच्या आकारावर अवलंबून असून शेतकऱ्याच्या श्रम आणि भांडवलावर नाही, असा विरोध त्यांनी केला. त्यामुळेच सहकारी शेतीचा अवलंब सर्वसाधारण भागात करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Success Story । एकेकाळी होता ऑफिस बॉय! जिद्दीच्या जोरावर शेती करत कमावलं लाखो रुपये, वाचा यशोगाथा

खोती प्रथा रद्दसाठी विधेयक

खोती पद्धतीनुसार शेतकर्‍यांकडून कर वसूल खोत काहीही करत. यासाठी आंबेडकरांनी 1937 मध्ये मुंबई विधानसभेत खोती प्रथा रद्द करण्यासाठी विधेयक मांडून खोती प्रथा संपुष्टात आली.

Harbhara Bajar Bhav । अर्रर्र! हरभरा दरात कमालीची घसरण, किती मिळतोय दर; जाणून घ्या..

शेतीचे राष्ट्रीयीकरण

आंबेडकरांनी शेतीचे राष्ट्रीयीकरण करण्याची संकल्पना मांडली. सरकारने काही जमिनी ताब्यात घेऊन त्यांचा विकास करावा आणि विकसित झालेल्या जमिनी शेतकऱ्यांना शेतीसाठी द्याव्या, याद्वारे शेतकऱ्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, असा विचार आंबेडकरांनी मांडला. दरम्यान, आंबेडकर यांची ही संकल्पना शेतक-यांसाठी आज किती महत्वाची आहे, हे लक्षात येते.

Onion Rate । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर, जाणून घ्या

पाणी

आंबेडकर शेतीबाबत विचार मांडताना पाण्याला महत्वाचं स्थान असल्याच सांगत. शेतीला समृद्ध करायचे असल्यास पाण्याचे योग्य नियोजन करावे. 1942 ते 1946 या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना आंबेडकर यांनी देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार सरकारपुढे मांडला होता. ब्रिटिश सरकारला नदीच्या खोऱ्यातील ‘दामोदर खोरे परियोजना’ ही पाण्याची योजना सादर केली होती. 1996 मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खो-यांची विभागणी देखील केली होती.

Expensive Tree । बापरे! तब्बल शंभर कोटींचं झाड, असते 24 तास सुरक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *