Ajit Pawar

Ajit Pawar । टोमॅटो, कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी आक्रमक; अडवला अजित पवारांचा ताफा

बातम्या

Ajit Pawar । नाशिक : कांद्याचा (Onion Rate) दिवसेंदिवस प्रश्न गंभीर होत चालला आहे. जास्त उत्पादन आणि कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग नाराज झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी शंभरी पार केलेला टोमॅटो आज कवडीमोल भावात (Tomato Price) विकला जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात सरकारविरोधात नाराजीचे वातावरण पसरले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकदिवसीय नाशिक दौऱ्यावर आले आहेत.

Agriculture News । पीक फवारणीसाठी ड्रोनचा वापर करायचाय? तर मग ही बातमी वाचाच

परंतु, त्यांचा ताफा संतप्त शेतकऱ्यांनी अडवला आहे. कांद्याला हमीभाव नाही, टोमॅटोला दहा रुपये किलोचा भाव (Onion and Tomato Price) मिळत आहे. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अजित पवार यांचा ताफा दिंडोरी-कळवण रस्त्यावर शेतकऱ्यांकडून अडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु यात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.

Success Story । शेतकऱ्याची कमाल! अवघ्या दीड महिन्यात 40 गुंठे कोथिंबिरीतून घेतले तीन लाखांचे उत्पन्न

पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. यावेळी रस्त्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. एकीकडे अजित पवारांचे नाशिकमध्ये ठिकठिकाणी स्वागत होत आहे तर दुसरीकडे कांदा उत्पादक आणि टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.

PM Kisan Yojana । धक्कादायक! ८९०० मृत शेतकऱ्यांच्या नावावर जमा होतेय पीएम किसानची रक्कम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *