Ajit Pawar । कांद्याने (Onion) यावर्षी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटू शकतो. कारण काल केंद्र सरकारने (Central Govt) कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Ban export onion) घातली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे नाराज झाले आहेत. सरकारने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर शेतकरी सरकारविरोधात आंदोलन करू शकतात.
Chinese Garlic । सावधान! तुम्हीही चिनी विषारी लसूण खात नाही ना? अशाप्रकारे तपासा
यंदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. काही ठिकाणी तर पावसाने (Rain in Maharashtra) पाठ फिरवली आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, याउलट सरकारने शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. निर्यात बंदी (Onion Export Ban) 31 मार्च 2024 पर्यंत राहणार आहे, याबाबत सरकारनं एक परिपत्रक काढलं आहे.
दिल्लीतील हालचाली वाढल्या
कांदा निर्यात बंदीमुळे दिल्लीतील हालचाली वाढल्या आहेत. या संदर्भात सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेत कांदानिर्यात बंदीविरोधात पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे.
Tur Import । तुरीचे दर वाढणार? मोझांबिकमधून आयात थांबली
कांद्याच्या दरात मोठी
कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. निर्यातबंदीनंतर कांद्याच्या भावात कमालीची घसरण झाली आहे. मराठवाड्यातील कडा बाजारपेठेत कांद्याला प्रतिकिलो 25 रूपये दर (Onion Price) मिळत आहे. कांद्याची निर्यात सुरू असताना कांद्याला 50 रुपयांचा दर मिळत होता. परंतु, कांद्याची निर्यात बंदी केल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Soybean Rate । साेयाबीन उत्पादकांवर मोठं संकट! उत्पादन खर्चही निघणं अशक्य
अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापारी बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान, मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी यांची भेट घेतली जाणार आहे, अशी माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता दिल्लीत होणाऱ्या बैठकीत कोणता निर्णय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Onion Rate । पाकिस्तानात कांद्याला किती मिळतोय दर? किंमत जाणून तुम्हीही व्हाल चकित