Agriculture Well । शेतीसाठी पाण्याची खूप गरज असते. अनेकांना विहीर खोदणे शक्य नसल्याने ते दूरवरून पाइपलाइनची सोय करतात. काहीजण पाण्यासाठी शेततळे तर काहीजण बोअरवेलचा वापर करतात. दरम्यान, सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन अनेकजण विहीर (Well) खोदत आहेत.
Government schemes । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे अनुदान
दहा लाख विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट
राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (MNREGA) येत्या पाच वर्षांत दहा लाख विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या वर्षी योजनेला (Government schemes) व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, अशी माहिती राज्याचे ‘मनरेगा’ आयुक्त अजय गुल्हाने यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
Milk production । ‘या’ देशात केले जाते सर्वात जास्त दूध उत्पादन; वाचा बातमी
गुल्हाने बोलताना म्हणाले की राज्यात सिंचन प्रकल्पांना मर्यादा असल्याने वैयक्तिक स्तरावर सिंचनाचे स्रोत शेतकऱ्यांकडे असावे याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअंतर्गत शेततळे, विहिरींसाठी मनरेगातून अनुदान देण्याची तरतूद केली आहे. परंतु विहिरींच्या तुलनेत शेततळ्यांना मिळणारा प्रतिसाद खूप कमी आहे. शेततळ्यांमध्ये जास्त जागा जाते, असे शेतकऱ्यांना वाटत असल्याने याला प्रतिसाद कमी मिळतो.
Desi Ber । गावरान बोरांनी गाठला उच्चांक, प्रतिक्विंटल मिळतोय १००० ते २००० रुपयांचा दर
राज्यात येत्या पाच वर्षांत दहा लाख विहिरी बांधण्याचे प्रस्तावित असून यातील पाण्याचा वापर रब्बी पिकांसाठी झाला तर राज्यात रब्बी क्षेत्र वाढेल त्यातून दुबार पीकपद्धतीला चालना देखील मिळेल. याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न नक्कीच वाढू शकते. यासाठी मनरेगातून विहिरीच्या कामाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
ऑनलाइन करता येणार नोंदणी
पूर्वी विहिरीकरिता नोंदणीसाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. पण आता ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी MAHA-EGS Horticulture/well हे ॲप विकसित केले आहे. हे ॲप प्ले-स्टोअरवर आहे. तुम्ही त्यावर नोंदणी करू शकता. प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्याच्या अर्जाचे ट्रॅकिंग व्हावे, यासाठी सेक्युअर ही ऑनलाइन प्रणाली आहे.
Maize Import । आता भारतात येणार म्यानमारची मका, आयातीसाठी सरकारच्या हालचाली सुरु