Agriculture Technology

Agriculture Technology । युवा शेतकऱ्याचं अनोखं जुगाड! स्वतःच बनवला इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेयर

तंत्रज्ञान

Agriculture Technology । अनेकजण पिकावर फवारणी करण्यासाठी हातपंपाचा वापर करतात त्यामुळे काहींना विषबाधा होते. या विषबाधेतुन काही लोक आजारी पडतात तर काहींना आपला जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी अनेकजण जुगाड तयार करतात. त्याचा त्यांना खूप फायदा होतो. एका युवा शेतकऱ्याने देखील असेच एक अनोखे जुगाड तयार केले आहे.

Black Wheat Sowing । रब्बी हंगामात करायची असेल बक्कळ कमाई तर काळ्या गव्हाची लागवड, मिळतोय ‘एवढा’ दर

अजित खर्जुल असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते एकलहरे (ता. जि. नाशिक) येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे पाच एकर जमीन आहे. त्यांच्यावर लवकर जबाबदारी पडली, त्यामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. ते वडिलांना शेतात मदत करू लागले. त्यांच्या वडिलांना द्राक्ष शेतीचा अनुभव आहे. परंतु खर्च जास्त असल्याने ते द्राक्ष शेती करत नाही. सध्या ते भाजीपाल्याचा व्यवसाय करतात.

Ration Card । सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ शिधापत्रिकाधारकांना मिळणार मोफत मिळणार साडी, असा घ्या लाभ

अशी सुचली कल्पना

फवारणी करताना चिखलात ट्रॅक्टर अडकतो, असे अजित खर्जुल यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी २०१८ मध्ये फवारणी करणाऱ्या ड्रोनची निर्मिती केली. द्राक्षशेतीमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फवारणी यंत्राचा (Electrostatic sprayer) वापर अनेक बागायतदार करीत आहेत. ही यंत्रे परदेशी किंवा अमेरिकी तंत्रज्ञानावर आधारित असल्याने त्यांच्या किमती खूप जास्त आहेत. त्याचा इतर खर्च खूप जास्त असतो.

Unseasonal Rain। कोकणसह मध्य महाराष्ट्रात का पडतोय अवकाळी पाऊस? जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण

त्यामुळे त्यांनी भारतीय बनावटीचे यंत्र बनवले. त्यासाठी त्यांनी त्या दृष्टीने तीन वर्षांपूर्वी काम सुरू केले. यात त्यांचा धाकटा भाऊ विकास यांनी हा ‘ॲग्री स्टार्ट अप’ म्हणून करावा असे सुचवित असताना मदत केली. यात वॉटर पंप व गिअर बॉक्स, कॉम्प्रेसर या परदेशातून आयात केलेल्या साहित्याचा वापर केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या दरम्यान हे फवारणी यंत्र चाचण्यांसाठी बाजारात आणले आहे.

Success Story । उच्चशिक्षित दाम्पत्याची कमाल! अवघ्या 5 महिन्यात केशरमधून मिळवले 8 लाख रुपये

जाणून घ्या फायदे

  • पाणी (वॉटर प्रेशर, हवेचा दाब (एअर प्रेशर) यांचे सेटिंग करण्यासाठी अॅनालॉग मीटर.
  • अमेरिकी बनावटीच्या यंत्राच्या तुलनेत १२७ लिटर जास्त द्रावण साठवण क्षमता आहे.
  • एकूण १४ नोझल्स. दुरुस्त करण्याजोगे. ३६० अंशांत एकसारखी फवारणी.
  • देशातील द्राक्ष लागवडीचे अंतर आणि बागेची उंची पाहता ‘एअर फिल्टर’ फवारणी टाकीच्या झाकणाला समांतर बसवण्यात आला आहे. द्राक्षवेली, घडांना घासत नसल्याने नुकसान नसते.
  • या यंत्राची किंमत १८ लाखांपर्यंत आहे.
  • यंत्राचा सांगाडा आणि अन्य ठिकाणी ‘स्टेनलेस स्टील’चा वापर केल्याने गंजण्याचे प्रमाण कमी असते.
  • पाण्याच्या थेंबाचा आकार चाळीस मायक्रॉन, विद्युतभारसहित तसेच हलके असल्याने खालून वरच्या भागात ते पोहोचले जाते.

Milk Rate । दूध दरावरून रयत क्रांती संघटनेने घेतली आक्रमक भूमिका, विखे-पाटील यांच्या घरासमोर करणार आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *