Agriculture Technology । शेतीमध्ये सध्या खूप बदल झाला आहे. पूर्वी जनावरे किंवा मनुष्याच्या माध्यमातून मशागत केली जायची. परंतु, आता बाजारात विविध मशिनरी आल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या (Agri Technology) मदतीने शेती केली जाऊ लागली आहे. यामुळे कामे जलद गतीने आणि स्वस्तात होऊ लागली आहेत. यामुळे शेतीत जास्त मनुष्य बळाची गरज पडत नाही. (Technology of Agri)
तयार केली दुचाकीवरील यंत्रणा
परंतु, या मशिनरींचा (Agri Machinery) खर्च प्रत्येकाला परवडतो असे नाही. त्यामुळे शेतकरी घरबसल्या काहीतरी हटके जुगाड करतात. सोशल मीडियावरही (Social media) हे जुगाड व्हायरल होत असतात. ते पाहून इतर शेतकऱ्यांना देखील वेगळे जुगाड करण्याची कल्पना मनात येते. अशाच एका शेतकऱ्याने मशागतीचा कमी खर्चाचा पर्याय म्हणून दुचाकीवरील यंत्रणा (Development of Two-Wheeled Systems) तयार केली आहे.
Ethanol Subsidy । केंद्र सरकारचा मोठा निर्णय! इथेनॉल निर्मितीसाठी मिळणार अनुदान
प्रवीण मते (Pravin Mate) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते हिरापूर (ता. अंजनगावसुर्जी, अमरावती) येथील रहिवासी आहेत. हा परिसर सातपुडा पर्वतरांगांनजीक असल्याने भागात पारंपरिक पिकाच्या जोडीला शेतकरी संत्रा लागवडीवरही भर देण्यात येतो. काही शेतकरी पोल्ट्रीसारखे व्यवसाय करतात. याच ठिकाणी प्रवीण मते यांची अडीच एकर शेती आहे.
Labor Shortage । महिला मजुरांची मोठी टंचाई, कांदा लागवड रखडली
अशी सुचली कल्पना
या क्षेत्रात त्यांनी संत्रा लागवड केली आहे. बोअरवेलच्या मदतीने ते पिकाला पाणी देतात. परंतु त्यांना संत्रा बागेची मशागत करताना काही अडचणी यायच्या. त्यामुळे त्यांनी छोट्या ट्रॅक्टर खऱेदीचा विचार केला. परंतु त्यासाठी मोठा खर्च होईल, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे काहीतरी जुगाड करावा, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी मशागतीच्या कामांसाठी ३० हजार रुपयांचा खर्च करत दुचाकीवरील यंत्रणा तयार केली.
त्यांच्याकडे एक जुनी दुचाकी होती, तिला बाजारात तीन हजारांचा दर मिळत होता. त्यांनी ती न विकता त्यावर जुगाड करण्याचा निर्णय घेतला. या दुचाकीच्या माध्यमातून ते सरी पाडणे, वखरणी, डवरणी अशी आंतरमशागतीची कामे करतात. संत्रा झाडांवर फवारणी करण्यासाठी त्यावर कॉम्प्रेसर बसविण्याची सोय केली आहे. कमी खर्चात त्यांनी हे जुगाड तयार केले आहे.
Milk Subsidy । दूध अनुदानाची घोषणा हवेतच विरली, अजूनही जीआर नाही