Agriculture Subject

Agriculture Subject । मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार शालेय अभ्यासक्रमात शेती विषय समाविष्ट

बातम्या

Agriculture Subject । भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल ओढ निर्माण होऊन ग्रामीण भागात कृषिसंशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळणार आहे. कारण शेतीला प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाचा समावेश होणार आहे. याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. पुढील शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात शेती विषय (Agriculture Lesson) असणार आहे.

Sugarcane Rate । अखेर शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठं यश! टनामागे मिळणार १०० रूपये जास्तीचा दर

दीपक केसरकर यांनी केली घोषणा

महाराष्ट्राचे शालेय मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अभ्यासक्रमात पुढील वर्षापासून कृषी विषय असेल, अशी महत्त्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये असणारी शेतीविषयक उदासिनता दूर होण्यास मदत होईल. शिवाय त्यांना कृषी क्षेत्राची गोडी लागेल. सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग 0.93 टक्के आहे. तो आता तीन टक्क्यांवर जाईल.

Havaman Andaj । राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याने दिला अलर्ट

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या वयानुसार शेतीशी निगडित संदर्भ त्यांना शिकविण्यामुळे त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होईल. ज्याचा फायदा पीकउत्पादन पद्धतीत होऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांची नवी पिढी शास्त्रीय पद्धतीने शेती करेल. ज्यामुळे साहजिकच उत्पादनात वाढ होईल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जैव तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या शेतीला चालना देण्याची गरज या शिक्षणामुळे निर्माण होईल.

Agriculture Technology । भारीच! शेततळ्यात कुणी पडल्यास सेकंदात वाजणार अलार्म, विद्यार्थ्यांचा अफलातून शोध

“राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात राज्याला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी कटिबद्ध असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 5 डिसेंबर रोजी राज्यात “माझी शाळा सुंदर शाळा” अभियानाचा शुभारंभ करणार आहेत,” अशी माहिती केसरकर यांनी दिली. 2021 राज्य सरकारकडून मध्ये अभ्यासक्रमात शेती विषय आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (MSRTC) आणि महाराष्ट्र कृषी, शिक्षण आणि संशोधन परिषद (MCAER) यांना संयुक्तपणे अभ्यासक्रमाची रचना करण्यास सांगण्यात आले होते.

Export Of Fruits And Vegetables । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सागरी मार्गाने होणार फळे आणि भाजीपाल्यांची निर्यात

काय शिकता येईल?

या विषयाद्वारे विद्यार्थ्यांना फुलांपासून बटाट्यापर्यंत, गायी आणि डुकरांपासून ट्रॅक्टर आणि मातीपर्यंत शिकायला मिळेल. शिवाय त्यांना शेतीविषयक कामांची जाणीव करून देऊन त्यांच्या टेबलवर अन्न कसे मिळते, कपडे स्टोअरच्या कपाटात आणि बियाणे कसे येतात याची माहिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांची मातीशी नाळ जोडली जाईल. त्यांच्यामध्ये समाजाप्रती सामाजिक बांधिलकी निर्माण होईल.

Jowar Rate । ज्वारी खातेय भाव! किलोला मिळतोय ६० ते ६५ रूपायांचा दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *