Agriculture News

Agriculture News । पैसेवारी म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या दुष्काळाशी असणारा संबंध

बातम्या

Agriculture News । देशात यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यात काही भागांमध्ये अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने नुकतीच दुष्काळग्रस्त (Drought) गावांची यादी जाहीर केली आहे. यात राज्यातील ४० गावांचा समावेश आहे. सरकारने यानंतर आणेवारी (Aanewari), पैसेवारी (Paisewari) घोषीत करत आहे असे सांगितले. अनेकांना आणेवारी, पैसेवारी म्हणजे काय? ती कशी काढतात? आणि त्याचा दुष्काळाशी कसा संबंध असतो? असा प्रश्न पडतो.

Lek Ladki Yojana । गोरगरीब मुलींना मिळणार लाखो रुपये, काय आहे सरकारची भन्नाट योजना? जाणून घ्या

काय आहे आणेवारी?

जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा जास्त मालक असल्यास त्या प्रत्येक सहधारकाच्या वाटची जमीन किती हे दर्शवण्याची पद्धत म्हणजे जमिनीची आणेवारी होय. ब्रिटीश काळापासून साताबाऱ्यावर आणेवारी दाखल करतात. एक आणा म्हणजे बारा पैसे होय, महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार सांगायचे झाले तर जमीन महसूल थांबवण्यासाठी, कमी किंवा रद्द करण्यासाठी प्रत्येक गावातील कोरडवाहू, खरीप आणि रब्बी पिकांची पैसेवारी काढली जाते. यालाच आणेवारी असा शब्द पुढे प्रचलित झाला आहे.

Crop Milling । मळणी यंत्राद्वारे पीक काढणी करताय? घ्या आवश्यक खबरदारी, अन्यथा होईल मोठे नुकसान

अशी काढतात आणेवारी

गावांच्या शिवारात एकूण क्षेत्रफळाच्या ८० टक्क्यांपर्यंतच्या जमिनीत असणाऱ्या सर्व पिकांची पैसेवारी काढली जाते. १० मी x १० मी असा चौरस घेऊन त्यात निघणाऱ्या धान्याचे उत्पादन काढतात. गेल्या दहा वर्षाच्या पिकाच्या सरासरी उत्पन्नाशी काढलेले उत्पन्नाची तुलना करतात आणि त्यातून निघणारा अनुपात तपासण्यात येतो.

Fodder Crop । शेतकरी बांधवांनो, पौष्टिक चाऱ्यासाठी पर्याय शोधत आहात? तर मग लसूणघास चारा पिकाची लागवड कराच

दुष्काळाशी असणारा संबंध

एकूण पेरलेल्या किंवा लागवडीखाली असलेल्या क्षेत्रफळातून किती धान्याचे उत्पादन होणार हे ठरवण्यासाठी आणेवारी काढण्यात येते. ही आणेवारी काढत असताना त्याची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास दुष्काळ आणि त्यापेक्षा अधिक असेल तर सुकाळ मानला जातो.

Custard Apple । देशी सीताफळाची चवच न्यारी! मागणीमुळे दरात मोठी वाढ

जाणून घ्या फायदा

पैसेवारीमुळे राज्य सरकारला धान्य स्थितीचा आढावा घेता येतो. जनसंख्येनुसार मग आवश्यकता तपासुन धान्य आयात वा निर्यात करावयाचे, त्याचा निर्णय करून त्यानुसार धोरण ठरवुन पुढे कार्यवाही केली जाते.

Success Story । शेतकऱ्याची लै भारी कमाल! एक एकर आल्यातून केली १२ लाखांची कमाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *