Agriculture News

Agriculture News । फुलांनी सजल्या बाजारपेठा, किलोला मिळतोय विक्रमी दर

बातम्या

Agriculture News । सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. या काळात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. खास करून दसरा आणि दिवाळी, लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर झेंडूसह इतर फुलांना चांगली मागणी असते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची आवक होते. जास्त मागणी असल्याने फुलांना चांगले दर (Flowers Price) मिळतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो.

Success story । यूट्यूबवर मिळाली प्रेरणा आणि वयोवृद्ध शेतकऱ्यानं केली ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती, कसे केलं नियोजन? पहा

यावर्षी पावसाने राज्याला चांगलीच ओढ दिली आहे. पाऊस नसल्याने पिके शेतातच जळून गेली आहेत. त्या त्या हंगामातील पिके शेतकऱ्यांना घेता आली नाहीत. सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. या काळात फुलांना चांगली मागणी (Flowers Price Hike) आहे. फुलांनी बाजारपेठा गच्च भरल्या आहेत. फुल उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. सणासुदीत फुलांना चांगला भाव मिळत आहे.

Kharif Season । शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, सरकारतर्फे पैसेवारी जाहीर करण्यास उशीर

किलोला मिळाला 100 रुपयांचा दर

झेंडूच्या फुलांची बाजारात 100 रुपये किलोने (Marigold Price) विक्री केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे दसऱ्यापर्यंत हेच दर 150 ते 200 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त फुलांची आवक सुरु आहे. तसेच ही आवक नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून सुरु आहे. परंतु, सर्वसामान्यांना फुले खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

Forbes Billionaires List । जिंकलस पोरा! फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत शेतकऱ्याच्या मुलाचा डंका, संपत्ती जाणून व्हाल चकित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *