Agriculture News । नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं असं कायमच म्हटलं जातं. शेतकरी कधी काय करेल याचा कोणी अंदाज लावू शकत नाही. सध्या देखील केरळमधील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचं कारण असं की, हा शेतकरी आपल्या ऑडी या गाडीतून भाजीपाला विक्री करत आहे. त्यामुळे सगळीकडे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अलीकडच्या काळात शेतकरी देखील कमी नाहीत शेतकरी शेतीत प्रगती साधून चांगले पैसे कमवून चारचाकी वाहनातून फिरताना दिसत आहेत. बरेच शेतकरी सध्या मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरतात. सध्या देखील व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमधील शेतकरी हा कोणत्या सामान्य गाडीत नाही तर आपल्या ऑडी गाडीत फिरून याच गाडीतून तो भाजीची विक्री करत आहे.
सुजित असे या केरळमधील शेतकऱ्याचे नाव आहे. सुजितने ऑडी गाडी घेतली आहे. या शेतकऱ्याने आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतीत प्रगती साधली आणि त्याने इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला. आपली आलिशान गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून तो भाजी विकत आहे. हे दृश्य पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.
Udid Rate । उडदाच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या एका क्लिकवर
सुजीचे स्वतःचे सोशल मीडिया अकाउंट असून तो त्याच्या शेतातील पिकांची आणि त्याच्या कुशल कारागिरांची छायाचित्रे सतत सोशल मीडियावर शेअर करत असतो/ यामध्येच आता त्याची लोकप्रियता अजूनच वाढली आहे. सोशल मीडियावर त्याने अनेक फोटो शेअर केले आहेत यामध्ये त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो त्याची ऑडी बाजारात घेऊन जाताना दिसत आहे. त्यानंतर शेतकरी प्लास्टिकचा पत्रा टाकून त्यावर भाजीपाला विकत आहे.
Soybean Rate । सोयाबीनला आज किती बाजारभाव मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर