Agriculture news

Agriculture news । सफरचंद उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

बातम्या

Agriculture news । भारत हा कृषिप्रधान देश आहे. अनेक पिकांचे येथे उत्पन्न घेतले जाते. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. शेतकरी आता आधुनिक शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. यासाठी योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे. परंतु अनेकांचा शेतीवरच उदरनिर्वाह होत नसल्याने ते शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय सुरु करतात.

Namo Shetkari Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

सफरचंदाचे उत्पन्न (Apple yield) खरंतर काश्मीरमध्ये घेतले जाते. परंतु आता भारतातील शेतकरी सफरचंदाचे पीक घेऊ लागले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सफरचंद खूप गरजेचे आहे. त्यामुळे वर्षभर सफरचंदाला खूप मागणी असते. हिमाचल प्रदेशमधील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकाकडून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

सफरचंदाचीही नाफेडमार्फत खरेदी होणार?

नाफेडमार्फत तांदूळ आणि गव्हाची खरेदी केली जाते. अशातच आता सफरचंदाचीही नाफेडमार्फत खरेदी केली जाऊ शकते. (Nafed procurement of Apples) याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे नाफेडमार्फत सफरचंद खरेदी करावी अशी मागणी केली आहे. मागणीवरून त्यासंदर्भात एक समिती स्थापन केली आहे. ही समिती हिमाचल सरकारच्या मागणीचा आढावा घेऊन सरकारला अहवाल सादर करणार आहे.

Success story । शेतकऱ्याची लै भारी कमाल! २५ टन पेरूतून घेतले तीस लाखांचे उत्पन्न

लवकरच नाफेडमार्फत सफरचंद खरेदी केले जाऊ शकतात, यामुळे शेतकऱ्यांना सफरचंदांना रास्त दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. यात सर्वात जास्त नुकसान सफरचंदांच्या शेतीचे झाले आहे. अवकाळी पावसाने सफरचंदाची फळे झाडावर कुजून गेली आहेत. त्यामुळे यंदा सफरचंदाच्या उत्पन्नात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Havaman Andaj । येत्या दोन दिवसात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार परतीचा पाऊस, जाणून घ्या IMD अलर्ट

पावसामुळे रस्ते खराब झाल्याने सफरचंद बाजारपेठेत पोहोचू शकत नाहीत. याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता थेट शेतकऱ्यांकडून सफरचंद खरेदी करावी, ही मागणी जोर धरत आहे. या मागणीचा विचार करून केंद्र सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. लवकरच नाफेडमार्फत सफरचंद खरेदी करण्याची शक्यता आहे.

Agriculture News । नुकसानग्रस्तांना मिळाला दिलासा! सरकारकडून मिळाले तब्बल 154 कोटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *