Agriculture News

Agriculture News । काजव्यांचे शेतीमध्ये काय योगदान आहे? वाचा सविस्तर माहिती

कृषी सल्ला

Agriculture News । पूर्वी पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी काजवे लुकलुकत असत. मात्र काजवे गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज तास भर अंधारात फिरलो तरी नजरेला जेमतेम एक तरी काजवा दिसला तर नशीब. हे काजवे गेले तरी कुठे? त्यांचं भविष्य काय? त्यांचा जीवनक्रम कसा असतो? काजवे काय खातात? ते कसे चमकतात? जाणून घेऊया यांबद्दल माहिती.

Onion Rate । मोठी बातमी! कांद्याचे भाव वाढणार? लासलगावमध्ये आजपासून लिलाव बंद

काजवे हे भुंग्यांच्या कुळात मोडतात, जगभरात काजव्याच्या जवळपास २००० विविध प्रजाती विखुरलेल्या आहेत. त्यातील भारतात जेमतेम ९ ते १० प्रजाती आढळतात. काजव्यांचा जीवनक्रम पूर्ण व्हायला एक वर्ष जातं. पावसाळ्यात एक मादी तब्बल १०० अंडी देते. ही अंडी ती एखाद्या झाडाच्या खोडामधे किव्वा पाणथळ जागांच्या शेजारी, किव्वा उंच गवताळ ठिकाणी पालापाचोळा मध्ये दिली जातात. काजव्याची अंडी व अळी दोन्ही अंधारात चमकतात. (contribution of cashews in agriculture)

Onion Rate । लासलगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीत आज कांद्याला किती दर मिळाला? वाचा सविस्तर

साधारण दोन आठवड्यात अंड्यातून कजव्याची अळी बाहेर येते, आणि मग सुरू होतो जगण्यासाठीचा तिचा संघर्ष. ह्या काळात ती छोटे मोठे किडे, शेतीस नुकसानदायक असलेले कीटक व अळ्या तसेच शेतात पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई, इत्यादी खाऊन फस्त करतात. आणि त्या विकासाच्या पुढल्या टप्प्यात जातात. प्रत्येक वेळी जेव्हा त्यांचा आकार वाढतो तेव्हा त्या कात टाकतात. एकूण पाच वेळा कात टाकल्यानंतर अळ्या विकासाच्या पुढच्या टप्प्यात येतात, जिथे त्या फुलपाखरा प्रमाणे कोश रुप धारण करतात. तो वेळ असतो मे ते जून महिन्याच्या. आणि पावसाच्या एक दोन जोरदार सरी येऊन गेल्या नंतर ह्या कोषातून लुकलुकणारे काजवे बाहेर येतात.

Raju Shetti । हवामान अंदाज बरोबर नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, सरकारचे दुर्लक्ष; राजू शेट्टी यांचे गंभीर आरोप

आता त्यांचे दुसरे आयुष्य सुरू होते, जिथे ते हवेत उडणारे लहान मोठे कीटक खातात. लहान मोठ्या किटकांव्यातिरिक्त ते स्वाजाती भक्षण देखील करत असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक जातीचा काजवा एका विशिष्ट पद्ध्तीने लुकलुकत असतो. काही काजवे अगदी कमी वेळात जलद गतीने लुकलुक करतात, तर काही मंद गतीने लुकलुकत असतात. त्यांच्या लुकलुकणाऱ्याची वारंवारता त्यांना त्यांच्या जनुकीय संरचनेच्या आधारे मिळते. ज्यामुळे हे काजवे आपल्या जातीच्या नर व मदींना ओळखतात आणि आकर्षित करतात. काही जातीच्या मादी इतर जातींच्या लुकलुक करण्याच्या पद्धतीची नक्कल करून दुसऱ्या जातीच्या नराला आकर्षित करतात व त्याला भक्ष देखील बनवतात.

असे हे काजवे कोषातून बाहेर आले की त्यांच्या जवळ खूपच कमी वेळ असतो. कारण कोषातून बाहेर आल्यावर त्यांचे आयुष्य केवळ दहा ते पंधरा दिवसांचे असते. एवढ्या कमी वेळात त्यांना मादी सोबत मिलन करून त्यांची पुढली पिढी निर्माण करण्यासाठी स्पर्धा सुरू असते. म्हणून बहुदा बरेच नर काही न खाता केवळ मिलन करणे हाच एक क्रम सुरू ठेवतात आणि लवकरच मरून जातात. पुढे मादी देखील अंडी दिल्या नंतर अवघ्या काही दिवसात मरून जाते. आणि आता अंड्यातून अळी पासून कोश आणि कोषापासून काजवा तयार व्हायला तब्बल एक वर्षाचा काळ लागतो. आपल्या आयुष्याचा खूप मोठा काळ अश्या रीतीने काजवे जमिनीवर काढत असतात.

Havaman Andaj । सावधान! देशासह राज्यातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; पाहा हवामान विभागाचा अंदाज

काजवे पूर्वी खूप दिसायचे कारण त्या काळी बऱ्याच पाणथळ जमिनी अस्तित्वात होत्या, ठीक ठिकाणी असलेल्या पाणथळ जमिनींमुळे भूजल पातळी काठोकाठ भरलेली असे परिणामी जमिनीतील आद्रता पूर्ण वर्षभर टिकून राहत असे, तसेच त्या वेळी मोठं मोठी गवताची कुरणे अस्तित्वात होती ज्या मुळे उंच वाढलेल्या दाट गवता मुळे सूर्यप्रकाश जमिनी पर्यंत पोहोचत नसे. ज्या मुळे तेथे काजव्यांसाठी योग्य आद्रता वर्षभर टिकून राही. तसेच शेतांच्या बांधावर नागफणी, थेंगड, इत्यादी काटेरी झाडांचे कुंपण असे ज्या मुळे अश्या ठिकाणी देखील आद्रता चांगल्या प्रकारे राहत असे आणि बरोबर ह्या ठिकाणी असलेल्या खेकड्याच्या सुक्या बिळात कजव्यांच्या अळ्या रात्री चमकताना दिसत. पुढे हळू हळू एका पाठोपाठ एक पाणथळ जागा आणि गवताळ कुरणे नष्ट होत गेल्या, ज्या मुळे जमिनीतील आद्रता पावसाळा संपल्यानंतर देखील टिकेनाशी झाली. परिणामी काजव्यांच्या अळीला जगण्यासाठी आवश्यक असलेली आद्रता मिळेनाशी झाली.

Desi Jugad । शेतकऱ्याने बनविले भन्नाट जुगाड! पीक नष्ट करणाऱ्या भटक्या जनावरांसाठी शोधला उपाय; व्हिडीओ एकदा बघाच

पुढे शेतात देखील माणसाने फवारणी आणि रासायनिक खते टाकायला सुरुवात केली. ज्या मुळे इतर उपद्रवी किटकांपाठोपाठ परागीभवनासाठी उपयुक्त असणाऱ्या मधमाश्या आणि इतर काजव्यांसरख्या शेतीस उपयुक्त कीटक देखील नष्ट झाले. उरली सुरली कसर वाढत्या शहरकरणाने पूर्ण केली. ज्या मुळे अगदी थोडा वेळ मिलनासठी पंख उघडून लुकलुक करणारे हे कीटक रात्रीच्या वेळी लावलेल्या एल. ई.डी. आणि इतर झगमगाटामुळे त्यांना त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले. ज्या मुळे आधीच कमी उरलेल्या काजव्यांच्या संख्येत आणखीन घट होत गेली. पुढे निसर्ग पर्यटन या नावाखाली उरल्या सुरल्या ठिकाणी जिथे आजही काजवे त्यांची शेवटची लुकलुक करून पृथ्वीच्या पाठीवरुन कायमचे नष्ट होणार आहेत. अश्या ठिकाणी ही विचित्र शहरी माणसे यायला लागली तिथे नाईट ट्रेल, करत सोबत बॅटरी घेऊन फिरू लागली. ज्या मुळे काजव्याना घनदाट जंगलात देखील आता त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले आहेत.

Battery Operated Spray Gun । ‘या’ बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रे गनच्या सहाय्याने शेतातील फवारणी होणार झटपट; जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती

अवघ्या तीस वर्षात काजव्या पाठोपाठ असे कितीतरी बहुउपयोगी कीटक आपण संपवले आहेत ज्याचा खूप भयानक परिणाम येत्या काळात आपल्याला भोगावा लागणार आहे. निसर्गाच्या काठीला आवज नसतो. कधी तो करोना बनून तर कधी अंफान, निसर्ग सारख्या चक्रीवादळाच्या रूपाने आपल्याला आपली जागा दाखवून देतो. येत्या फक्त पाच वर्षात जागतिक तापमान वाढीमुळे आणखी भयानक संकटे ओढवणार आहेत, ज्यात संपूर्ण मानवा सहित जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. आता तरी निसर्गाची हाक ऐका पुन्हा नैसर्गिक शेती आणि माती कुडाच्या घरात जा तसे करणे मागास मुळीच नाही तेच खरे शास्वत जीवन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *