Agriculture News

Agriculture News | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार जास्त भरपाई

बातम्या

Agriculture News | शेतकऱ्यांना सतत विविध संकटांचा सामना करावा लागतो कधी निसर्गाचा लहरीपणा (Heavy rain) तर कधी शेतमालाला हमीभाव मिळत नाही. साहजिकच शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला येतात यावर्षी देखील अशीच समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी निसर्गापुढे हतबल झाले आहेत काही शेतकरी कर्ज (Loan) न फेडता आल्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत. यामुळे त्या शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते.

Dog Race। ऐकावं ते नवलच! शेतकऱ्याला कुत्रीने जिंकून दिल्या ६ चांदीच्या गदा, ३ फ्रिज आणि ४ बाइक

शेतकऱ्यांना मिळणार वाढीव दराने नुकसान भरपाई

यंदाही शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका सहन करावा लागला यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. म्हणून शेतकरी मदतीची अपेक्षा करत होते याच संदर्भांत केंद्रीय पथकाने नुकसान झालेल्या ठिकाणची पाहणी देखील केली. अशातच आता या शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसान भरपाई मिळणार आहे.

Shakira Cow । नादच खुळा! ‘या’ शेतकऱ्याची गाय दिवसाला देते 80 लिटर दूध, अशाप्रकारे केले जाते संगोपन

यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर भरपाई देण्याकरिता विभागातील सर्व जिल्ह्यांनी पुढील तीन दिवसात माहिती पाठविण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. इतकेच नाही तर जमीन महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या आणि वाळू डेपो कार्यान्वित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Warehouse In Village : आता गावागावात सरकार उभारणार गोदाम, शेतकऱ्यांना साठवता येणार शेतमाल; जाणून घ्या जीआर

शेतकऱ्यांना होणार फायदा

दरम्यान, नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांकडून प्राप्त माहितीनुसार एकूण ५५,१५७.४३ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ७४६४.८५१ लक्ष निधीची मागणी अहवाल सादर केला. १९ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर वाढीव मदत करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार १ जानेवारी २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता.

Farmers Interest Waive : मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

इतकेच नाही तर विभागात ठरवून दिलेले ८२५ कोटींचे उद्दिष्ट जमीन महसूल आणि गौण खनीजाच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागातील यंत्रणांनी जोमाने काम करून उद्दिष्टपुर्तीची दखल जिल्हाधिकारी ते तलाठीपर्यंतच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गोपनिय अहवालामध्ये घेतली जाणार आहे.

Congress Grass : शेतातील कांग्रेस गवताने हैराण झालात? करा ‘हा’ रामबाण उपाय, होईल संपूर्ण गवताचा नायनाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *