Agriculture News । भारत हा कृषिप्रधान देश असून या देशात शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतात. परंतु शेतकऱ्यांना सतत पूर,अवकाळी पाऊस तर कधी शेतमालाला कमी हमीभाव यांसारख्या संकटांचा सामना करावा लागतो. त्यासाठी सरकार शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नवनवीन योजना राबवत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो.
Havaman Andaj । पुणेकरांना पावसाने झोडपले; जाणून घ्या तुमच्या भागातील हवामान अंदाज
परंतु शेतकऱ्यांच्या काही चुकांमुळे उत्पन्नात घट होते. सर्वेक्षणानुसार मागील दोन वर्षांत हवामान बदलामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 15.7 टक्क्यांची घट झाली असून या दरम्यान सहापैकी एका शेतकऱ्याचे उत्पन्न 25 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. हवामान बदलाने शेतीमध्ये निर्माण होणारी आव्हाने भविष्यातही कायम राहतील.
Chili Market । हिरव्या मिरचीचे भाव पडल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत; मिळतोय फक्त ‘इतका’ दर
जागतिक स्तरावर तीन चतुर्थांश शेतकऱ्यांनी असे सांगितले की, हवामान बदलाचा त्यांच्या शेतीवर नकारात्मक परिणाम झालेला आहे. त्यामुळेच जागतिक अन्नसुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. 71 टक्के शेतकरी हवामान बदलामुळं अनेक शेतकरी चिंतेत आहेत. तर 73 टक्के शेतकऱ्यांनी कीटकनाशके आणि पिकावरील रोगांमुळे त्यांच्यावर अधिक दबाव येत असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना सतत नवनवीन संकटांना सामोरं जावे लागतं. यात त्यांच्यावर कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट येते. याचाच परिणाम त्यांच्या खिशावर होतो. जर हे संकट असेच कायम राहिले तर त्यांच्यावर आणखी वाईट वेळ येऊ शकते.