Agriculture News

Agriculture News । काय सांगता! 12 वर्ष शेतकऱ्याने पायात घातली नाही चप्पल, केला होता संकल्प

बातम्या

Agriculture News । शेतीचा (Agriculture) भारताच्या अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा आहे. वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात. काही पिकांना बाजारात चांगले भाव मिळतात, परंतु काही पिकांना कमी बाजारभाव मिळतो. अनेकदा शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडतो. बाजारभावासाठी शेतकरी रस्त्यावर उतरतात. परंतु एका शेतकऱ्याने एक अनोखा संकल्प केला होता.

Crop Insurance । 8 दिवसात पीक विम्याची भरपाई करा, नाहीतर होणार कारवाई; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा इशारा

जाणून तुम्हालाही नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. तेलंगणा राज्यातील मनोहर शंकर रेड्डी या शेतकऱ्याने एक संकल्प केला होता. या शेतकऱ्याने तब्बल 12 वर्ष आपल्या पायात चप्पल घातली नव्हती. कारण जोपर्यंत हळद मंडळ (Turmeric Board) स्थापन होणार नाही, तोपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही, असा संकल्प 4 नोव्हेंबर 2011 रोजी या शेतकऱ्याने केला होता.

Havaman Andaj । राज्यभर पावसाची उघडीप, नागरिकांना सोसावे लागणार उन्हाचे चटके; वाचा हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

12 वर्षांपासून घातली नाही चप्पल

मागील 12 वर्षांपासून ते चप्पल न घालता फिरत होते. कधीतरी हळद उत्पादक शेतकर्‍यांना मदत मिळेल, अशी त्यांना आशा होती. अखेर त्याचा संकल्प पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रीय हळद मंडळ (National Turmeric Board) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. परंतु, दुर्दैवाची बाब म्हणजे मनोहर शंकर रेड्डी यांच्याकडे शेतीसाठी जमीन नाही कारण नुकसान भरपाई काढण्यासाठी त्यांनी आपली सर्व जमिनीची विक्री केली आहे.

Crop Insurance । पैसे घेऊन पंचनामे न करणाऱ्या पीक विमा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी घडवली अद्दल, हात बांधले आणि…

दरम्यान, शंकर रेड्डी यांना अनेक जवळच्या व्यक्तींनी संकल्प सोडून चप्पल घालण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्यांनी कोणाचेच म्हणणे ऐकले नाही. त्यांचा मानस कधीतरी पूर्ण होईल, अशी त्यांना खात्री होती, आता मोदींच्या घोषणेनंतर त्यांनी 12 वर्षांनंतर चप्पल घातली आहे. त्यांच्या या निर्णयाचे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Kisan Loan Portal । कर्ज मिळवणे झाले आणखी सोपे! सरकारने खास शेतकऱ्यांसाठी आणले एक पोर्टल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *