Agriculture News

Agriculture News । बापरे! किलोला मिळतोय 3 लाखांचा दर, आजच करा ‘या’ पिकाची लागवड

कृषी सल्ला

Agriculture News । अलीकडच्या काळात कृषी क्षेत्राचा विकास झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी आता वेगवेगळी तंत्र वापरून शेती करू लागला आहे. शेतीचा भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. शेतीत शेतकरी वेगवेगळे प्रयोग घेत आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत.

Krushi Seva Kendra । कृषी सेवा केंद्र सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या नियम, येणार नाही कोणतीच अडचण

तुम्ही देखील आता शेतीतून योग्य नियोजनाने लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू शकता. आजची तरुण पिढी केशरची लागवड (Saffron Cultivation) करत आहे. ज्यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे. केशर (Saffron) प्रामुख्याने जम्मू-काश्मीरमध्ये पिकवले जाते. परंतु आता त्याची शेती महाराष्ट्रातही होऊ लागली आहे. किमतीचा (Saffron Price) विचार केला तर बाजारात एक किलो केशर तब्बल तीन लाख रुपयांना विकले जात आहे.

Kharip Pik Vima । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, मिळणार ६१३ कोटींची विमा भरपाई

या पिकांचे देखील घेतले उत्पन्न

बिहार राज्यातील गया या जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी आशिष कुमार सिंह यांनी शेतीत नवीन प्रयोग करावा असे ठरवले, त्यांनी तीन किलो केशर बियाण्याची लागवड (Saffron Cultivation Information) केली. लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांच्या आसपास या पिकाचा कालावधी असतो. विशेष म्हणजे त्यांनी केवळ केशर नाही तर काळे आणि निळे गहू, काळे बटाटे व काळी हळद, लाल तांदूळ व हिरवे तांदूळ या पिकांचे यशस्वीपणे उत्पादन घेतले आहे.

Onion Price । शेतकऱ्यांना कांदा रडवणार? दर कमी करण्यासाठी सरकारचा नवा डाव, ‘या’ ठिकाणी स्वस्तात विक्री

केशरसाठी त्यांनी काश्मीरच्या शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेतले. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केशरचे फुले उमलतील. केशरमध्ये एकदा फुल आले की ते तोडले जातात. त्यातून धाग्यांसारखे पातळ पुंकेसर बाहेर काढण्यात येतात. एक किलो केशरची किंमत तीन लाख रुपयापर्यंत असते. त्यामुळे जर तुम्हाला लखपती व्हायचे असेल तर तुम्ही केशरची शेती करू शकता.

Havaman Andaj । नागरिकांनो, सावधान! हवामान खात्याचा ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *