Agriculture Electricity

Agriculture Electricity । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच बारामतीतील ‘या’ गावांना मिळणार दिवसा वीज

बातम्या

Agriculture Electricity । सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. सध्या विजेची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न पडत आहे. याच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Electric Tractor । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकार देणार अनुदान

कारण आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी शासनाने महावितरणच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ राबवायला सुरुवात केली आहे. ‘एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लि.’या कंपनीची स्थापन केली आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यामध्ये सरकारी पडीक गायरान जमिनीवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यासाठी या कंपनीकडून पुणे, जालना, अकोला, बुलडाणा, वाशीम, नाशिक, नगर, जळगाव आणि नांदेड या ९ जिल्ह्यांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Voter ID Card । मस्तच! आता मोबाईलच्या मदतीने तयार करता येणार मतदान कार्ड

२२१ मेगावॉट विजेची निर्मिती

पहिल्या टप्प्यांत पुणे जिल्ह्यात २२१ मेगावॉट वीज निर्माण होणार असून त्यासाठी १ हजार ९१ एकर जागेची गरज आहे. या जमिनी १ रुपया वार्षिक भाडेपोटी ३० वर्षांच्या करारावर सरकारकडून मिळाल्या आहेत. ४१ पैकी २३ उपकेंद्र बारामती आणि उरलेली पुणे परिमंडलात येत आहेत. तसेच १० उपकेंद्रांना जागा उपलब्ध झाल्या आहेत.

Sheep Farming । आजच सुरु करा कमी खर्चात मेंढीपालनाचा व्यवसाय, या प्रजातींचे करा संगोपन

बारामती मंडलात लोणी देवकर आणि बाभुळगाव उपकेंद्रांतर्गत अनुक्रमे २०.१६ व ९.३८ मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. त्यासाठी अनुक्रमे १०० आणि ४५ एकर जमीन करारावर उपलब्ध झाली आहे. उरलेली २१ उपकेंद्रांना ४४० एकर अशी एकूण ५८६ एकर जमीन महावितरणला मिळाली आहे.

LPG Cylinder Price । मोठी बातमी! गॅस सिलेंडरच्या किमतींत तब्बल 209 रुपयांची वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *