Agriculture Electricity

Agriculture Electricity । वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट! रब्बी हंगाम धोक्यात

बातम्या

Agriculture Electricity । यंदा देशासह राज्याच्या काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतकरीवर्ग संकटात आला आहे. खरीप हंगामातील पिके पाऊस नसल्याने करपून गेली होती. सध्या रब्बी हंगामाची (Rabi Season) लगबग सुरु आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाकडून अपेक्षा आहे. परंतु हा हंगाम देखील धोक्यात आला आहे.

Drought in Maharashtra । अर्रर्र! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘इतकीच’ मदत, राहावे लागणार आर्थिक मदतीपासून वंचित

याला कारण आहे वीज (Electricity). सध्या शेतकरीवर्ग पीक पेरणीचे नियोजन करत आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा नाही. त्यामुळे रान ओलावून शेतकऱ्यांना पेरणी करावी लागत आहे, नुकतीच शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी केली आहे. उगवलेल्या पिकांना वीज नसल्याने वेळेमध्ये पाणी मिळत नाही. असे असल्याने पिके सुकून जाऊ लागली आहे. आता याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Milk Price । दूध दरावरून शेतकरी अडचणीत! जनावरांची कवडीमोल भावात विक्री, पावसाअभावी चाऱ्याचीही टंचाई

वीज कंपनीचा भोंगळ कारभार

वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे रब्बी हंगाम धोक्यात आली आहे, असा आरोप शेतकरी करत आहे. दरम्यान, यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन पीक हातातून गेले आहे. साहजिकच आता शेतकरी रब्बी हंगामातील पिकांवर अवलंबून आहे. परंतु आता महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे रब्बी हंगामही हातातून जातो की काय असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडत आहे.

Gauri Sugar Hirdgaon Factory । गौरी शुगर हिरडगाव कारखान्याचा पहिला हप्ता 3 हजार 106 रुपये; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

रब्बी हंगाम धोक्यात

विजेच्या सततच्या लपंडावामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. पिकाला पाणी कसे द्यावे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. कंपनीकडून कमी दाबाने वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यात कृषिपंप पुरेशा क्षमतेने चालत नाही. या समस्या तातडीने सोडवाव्यात. याबाबत वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Havaman Andaj । सावधान! या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

रब्बी हंगामात पिकांची लागवड झाली आहे. काही ठिकाणी लागवडीचे नियोजन सुरु आहे. परंतु वीजपुरवठा नियमित नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. हीच जर परिस्थिती कायम राहिली तर शेतकऱ्यांवर मोठे संकट येऊ शकते. जर वीज कंपनीकडून या समस्येवर लवकरात लवकर उपाय शोधून काढता आला नाही तर साहजिकच राज्याचे वातावरण तापू शकते.

Varieties of Wheat । शेतकऱ्यांनो, गव्हाची पेरणी करताय तर या प्रमुख जातींची करा पेरणी; हेक्टरी ७६ क्विंटल उत्पादन मिळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *