Abdul Sattar

Abdul Sattar । मोठी बातमी! कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कडक कारवाई; अब्दुल सत्तार यांचे आदेश

बातम्या

Abdul Sattar । सध्या राज्यभर कांद्याचा प्रश्न चांगला चिघळण्याचे पाहायला मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता कांदा व्यापारी वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे. व्यापाऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांवर तोडगा निघू शकला नाही त्यामुळे कालपासून कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. मात्र आता याबाबत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठी घोषणा केली आहे. (Abdul Sattar)

Havaman Andaj । सावधान! ‘या’ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

याबाबत अब्दुल सत्तार म्हणाले, लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापारांवर कारवाई करणार असल्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात लिलाव बंद ठेवणे योग्य नाही त्यामुळे पणन आयुक्त आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना सत्तारांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समिती व उप बाजारसमिती कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत.

Market Price । उडीद, कांदा आणि सोयाबीनला आज बाजारात किती दर मिळाला; जाणून घ्या एका क्लिकवर

शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस न आणल्याने बाजारामध्ये देखील शुकशुकाट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी अब्दुल सत्तार यांनी लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 26 तारखेला याबाबत बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र लिलाव बंद ठेवल्याने व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.

Crop Spraying । पिकावर फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी का? जाणून घ्या

अब्दुल सत्तार हे नाशिकच्या येवल्यामध्ये एका खाजगी कामासाठी आलेले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हे करणे योग्य नव्हे असे देखील अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

Animal care । काँग्रेस गवत खाल्ल्यामुळे जनावरांवर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *