Parbhani News

Parbhani News । मोठी बातमी! परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान; उभी पिके गेली पाण्याखाली

बातम्या

Parbhani News । गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून राज्यभर मुसळधार पावसाला सुरुवात झाली ते गणपती बाप्पाचे विसर्जन होईपर्यंत राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम दिसला. आज देखील हवामान विभागाने राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान मागच्या काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात देखील मागच्या काही दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

Havaman Andaj । सावधान! राज्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज

मागच्या 24 तासांमध्ये परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ७ व हिंगोली जिल्ह्यातील ३ मंडलांत अतिवृष्टी झाली, नदी नाल्यांना पूर आले आणि या पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन, हळद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मोठे पूल देखील पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

Onion Rate । आज कांद्याला किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

शेतकऱ्यांची खरी पिके वाया

सध्या होत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची खरी पिके वाया गेली आहेत. फक्त परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात नाही तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून या ठिकाणची देखील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा देखील नष्ट झाल्या आहेत त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

MS Swaminathan । शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेले महान व्यक्ती एम. एस.स्वामीनाथन यांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पाण्याची चिंता मिटली

मागच्या काही दिवसापासून राज्यभर होत असलेल्या पावसामुळे सर्वांचीच पाण्याची चिंता मिटली आहे. धरणांमधील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्याचबरोबर नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचा कुठलाही प्रश्न राहणार नाही. सध्याचे खरी पीक वाया गेले असले तरी रब्बी पिकाला या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे.

Soybean Rate । सोयाबीनची बाजारात आज कशी स्थिती आहे? जाणून घ्या आजचे बाजारभाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *