Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! गणेश विसर्जनाच्या दिवशी ‘या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; अलर्टही जारी

Blog

Havaman Andaj । गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून राज्यभर पावसाला सुरुवात झाली. यानंतर आता गणपती बाप्पाचे आज विसर्जन होणार आहे मात्र तरी देखील पावसाचा जोर कायमच आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. धरणांमधील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात दररोज मुसळधार पाऊस होत आहे तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी देखील कोसळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Buffalo Milk । करा ‘या’ जातीच्या म्हशीचे संगोपन! दिवसाला मिळेल ‘इतके’ लिटर दूध, होईल हजारोंची कमाई

आज हवामान विभागाने दक्षिण कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात, कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार तर उर्वरित राज्यांमध्ये तुरळकी ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे देखील आवाहन करण्यात येत आहे.

Agriculture News । सावधान! यामुळे उत्पन्नात होतेय मोठी घट, जाणून घ्या सविस्तर

आज दक्षिण कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर कोकणामधील ठाणे, रायगड मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या ठिकाणी हवामान विभागाने अलर्ट देखील जारी केला आहे. विदर्भासह उर्वरित कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळकी ठिकाणी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Havaman Andaj । पुणेकरांना पावसाने झोडपले; जाणून घ्या तुमच्या भागातील हवामान अंदाज

दरम्यान, काही भागांमध्ये अति मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आता मदतीची अपेक्षा सरकारकडून करत आहेत. सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *