Ahmdnagar Rain News । सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील मागच्या काही दिवसापासून पावसाने चांगलीच ओढ दिली होती. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत होते. मात्र मागच्या दोन दिवसापासून अहमदनगरमध्ये देखील तुफान पाऊस बरसत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Sitafal Rate । सीताफळाचे दर तेजीत; मिळतोय ९ हजार रुपये पर्यंत दर; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
अहमदनगर शहरासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये देखील पावसाने चांगली हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना जीवनदान मिळाले आहे.
सध्या पावसामुळे खरिपाची पिके अनेक ठिकाणी वाया गेली आहेत. मात्र रब्बी पिकाला याचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आज देखील हवामान विभागाने राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी सावधानता बाळगावी, कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे देखील सांगण्यात आले आहे.
Soybean Rate । आज सोयाबीनची बाजारातील परिस्थिती कशी? जाणून घ्या एका क्लिकवर