Sunflower Farming । शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो मात्र या सर्व संकटांवर मात करत शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात आणि भरघोस उत्पादन देखील घेतात. कमी खर्चात चांगला फायदा देणाऱ्या पिकांची लागवड सध्या शेतकरी करत आहेत. यामध्ये आता सूर्यफूल शेती देखील अशीच आहे. सूर्यफूल लागवड करून शेतकरी कमी वेळात चांगला नफा मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया ही शेती कशी करावी? नेमकी शेती करताना काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती.
Maharashtra Rain Update । राज्यभर पावसाचे पुनरागमन, मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान
कोणत्याही पिकाची लागवड करायची म्हटले तर त्याच्या वाणांची निवड ही करणे गरजेचे असते. तसेच सूर्यफुलाची लागवड करायची असेल तर शेतकऱ्यांनी फक्त सुधारित वाणांची निवड करावी जेणेकरून अधिक बियाणे आणि तेलाचे उत्पादन घेता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर सूर्यफुलाच्या वाणांचे संमिश्र आणि संकरीत वर्गीकरण करण्यात आले आहे. सूर्यफूलाचे पिकं हे 100 ते 120 दिवसांत तयार होते.
सूर्यफूल लागवड करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
सूर्यफूल लागवड करण्या अगोदर शेतकऱ्यांनी जमिनीची चांगली मशागत करणे आवश्यक आहे. त्यानंतर मशागत झाल्यानंतर सूर्यफुलाच्या सुधारित आणि संकरित वाणांची पेरणी करावी. तुम्हाला जर सूर्यफुलामधून चांगले उत्पन्न पाहिजे असेल तर त्यासाठी तुमच्या शेतात शेणखत किंवा गांडूळ खत टाकावे यामुळे उत्पन्नात मोठी वाढ होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे देखील गरजेचे आहे. सूर्यफूल पिकावर फुलोऱ्याच्या वेळी बोरॅक्सची फवारणी केली जाते. ज्यामुळे बियाणांची गुणवत्ता अबाधित राहते.
‘या’ ठिकाणी केली जाते सूर्यफुलाची लागवड
सध्या बरेच शेतकरी सूर्यफुलाची लागवड करताना दिसत आहेत. सूर्यफुलाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळतो त्यामुळे अनेकजण याची लागवड करतात. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि बिहारमध्ये सूर्यफुलाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. त्याचबरोबर या राज्यांमध्ये सूर्यफुलाचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होते.
जर तुम्ही सूर्यफुलाची शेती करताना योग्य नियोजन केले आणि सर्व गोष्टींचा अभ्यास करून याची लागवड केली तर तुम्हाला देखील यामधून चांगला नफा मिळेल. याबद्दल तुम्हाला जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुमच्या जवळच्या कृषी सहाय्यकांकडून माहिती घेऊ शकता ते तुम्हाला याच्या बियाणांपासून लागवडीपर्यंत सर्व माहिती देतील.
Soybean Rate । सोयाबीनचे भाव वाढले का? पाहा बाजारातील स्थिती