Success story । मनात जर जिद्द आणि कष्ट करण्याची मेहनत असेल तर कोणतेही काम अशक्य नसते. शेती करताना खूप कष्ट करावे लागतात. अनेकदा शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पिकांना पाणी नसल्याने कित्येकदा पिके जळून जातात. पण एका शेतकऱ्याने चक्क खडकाळ जमिनीत एक एकरमध्ये १२० टन ऊस उत्पादन (Sugarcane production) मिळवले आहे. (Farmer Success Story)
सतीश ऊर्फ सिद्राम शिवाजी पाटील (Satish Shivaji Patil) असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. ते कागल तालुक्यातील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे ते कृषी पदविकाधारक आहे. पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सतीश यांनी नोकरी न करता शेती करण्याची ठरवले. त्यांनी एक एकरमध्ये भरघोस उत्पादन मिळवून विक्रम नोंदविला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अशी केली सुरुवात
फेब्रुवारी महिन्यात त्यांनी शेताची ट्रॅक्टरच्या एक फाळी पलटीच्या साहाय्याने नांगरट करून मे महिन्यात ५ ट्रॉली शेणखत आणि १५ टन कंपोस्ट खत टाकून नांगरट केली. पाचफुटी सरी मारून २ जून, २०२२ रोजी पाणी देऊन वाफसा आल्यानंतर कुदळीने दीड फूट अंतरावर को ८६०३२ जातीच्या उसाची एक डोळा पद्धतीने लागवड करून उसाला पाणी दिले.
Sharad Pawar । शेतकरी मेळाव्यात शरद पवार कडाडले! म्हणाले; “मोदी सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही”
तसेच त्यांनी तीन महिन्यांनंतर भरणी केली. यासाठी रासायनिक खतांचे सहा ठोस देऊन किटकनाशके, जीवाणू खते, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके फवारून आळवण्या घेतल्या. यावेळी त्यांनी राधानगरी कृषी विभागामार्फत तालुक्यातून तब्बल ४०० शेतकऱ्यांनी पाटील यांच्या ऊसशेतीला भेट दिली. त्यांना विजय मगदूम (सिद्धनाळ) यांचे मार्गदर्शन तर कृषी सहायक ओंकार जाधव, बंडू जंगटे, महेश पटेकर, अमर पाटील (बानगे), केदार माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उत्पन्न
सतीश यांना कंपोस्ट, मशागत, शेणखत यासह रासायनिक खते फवारणीसाठी एकरी १ लाख १५ हजार रुपयांचा खर्च आला. तसेच खर्च वजा जाऊन २ लाख ९३ हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. यामुळे सतीश यांना आर्थिक लाभ झाला आहे.