Onion market । यंदा राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. सरकारने कांद्याचे दर (Onion rate) नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी (Onion export ban) केली. सरकारच्या या निर्णयाचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशातच आता कांदा बाजार समितीतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Onion price)
लाखोंचे चेक झाले बाउन्स
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी दिलेले ८ लाख रुपयांचे धनादेश वटले नाहीत. यामुळे या बाजार समितीत शेतकऱ्यांनी एकच गोंधळ केला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना रोख ८ लाख रुपये देण्याची वेळ व्यापाऱ्यावर आली. या मार्केटमध्ये गोणी आणि मोकळा कांदा खरेदी करण्यासाठी बाजार समितीने विविध वार ठरवून दिले आहेत.
Sharad Pawar । शेतकरी मेळाव्यात शरद पवार कडाडले! म्हणाले; “मोदी सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही”
दरम्यान, या कांदा मार्केटमधील जय सद्गुरू ट्रेडिंग कंपनीने एकूण १५ शेतकऱ्यांकडून सोमवारी कांदा खरेदी करून त्यापोटी त्यांना ८ लाखांचे धनादेश दिले. पण धक्कादायक बाब म्हणजे हे धनादेश शेतकऱ्यांनी बँकेत जमा केल्यानंतर ते वटले नाहीत. याबाबत शेतकऱ्यांना बँकेतून माहिती मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत बाजार समितीत धाव घेतली.
मागील काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीने धनादेशाबाबत अडत व्यापाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. दरम्यान, धनादेश बाउन्स प्रकरणे वाढत चालली होती, यामुळे बाजार समितीने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्याच दिवसाचा धनादेश देण्याचे आदेश दिले. पण पाहता शेतकऱ्यांना त्याच दिवसाचा धनादेश देणे अनिवार्य असूनही अनेक अडत व्यापाऱ्यांनी हा नियम धाब्यावर बसवला आहे.