Onion rates । यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका सहन करवा लागला आहे. कारण सुरुवातीला पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले, त्यानंतर सरकारकडून कांद्याचे दर (Onion) नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याची निर्यात बंदी केली. शेतकऱ्यांना कांदा कवडीमोल दरात विकावा लागला. अशातच आता कांदा उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (Onion price)
Jowar Rate । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ज्वारीची आवक वाढताच दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर
आगामी काळात वाढणार कांद्याचे दर
कारण येत्या काळात कांद्याचे दर आणखी वाढणार आहेत. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार दोन आठवड्यापूर्वी शनिवार आणि रविवार वगळता राज्यातील बाजारसमित्यांतील एकूण कांदा आवक ही ३.२५ ते ३.८० लाख क्विंटल झाल्याचे पाहायला मिळाले. मागील आठवड्यात त्यात आणखी घट झाली. ही आवक ती २.२० ते २.८० लाख क्विंटलवर आली. (Onion rate hike)
दरम्यान, पुणे येथील बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाने वर्तविलेल्या साप्ताहिक अहवाल आणि अंदाजानुसार येत्या काळात देशात कांद्याच्या किंमती वाढू शकतात. इतकेच नाही तर नाशिकमधील बाजारसमित्यांमध्येही कांद्याचे दर वाढत आहेत. येत्या काळात हे दर वाढण्याची आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही कांदा व्यापारी आणि निर्यातदारांनी सांगितले की देशातील अंतर्गत गरज वाढत असल्याने आणि दुसरीकडे हंगामातला लाल कांदा आवक कमी होत असल्याने कांदा बाजारभाव तीन आठड्यापासून १०० ते १५० रुपयांनी वाढून स्थिर झाले होते. जर निर्यातबंदी उठवली नसती, तरीही कांदा बाजारभाव वाढलेच असते.
शेतकऱ्यांना होईल फायदा
जर पूर्णपणे निर्यातबंदी हटवली, तर कांदा बाजारभावापोटी शेतकऱ्याला अडीच ते ३ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असता. अशातच आता नवीन शेतकऱ्यांना दोन ते अडीच हजारांच्या आसपास कांदा बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. याबद्दल मार्चमधील आवकेनंतरच चित्र स्पष्ट होईल. जर दर वाढले तर याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.
PM Kisan Yojana । शेतकऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट! खात्यात येणार करोडो रुपये, कसं ते जाणून घ्या