Success Story । राज्यात मोठ्या प्रमाणात संत्रा, मोसंबी, केळी, डाळिंब, द्राक्ष ही पारंपारिक फळपिकांची लागवड (Cultivation of traditional fruit crops) करण्यात येते. असे असले तरीही सध्या आधुनिक शेती (Cultivation of fruit crops) म्हणून अनेक शेतकऱ्यांमध्ये सफरचंद लागवडीची (Apple cultivation) क्रेझ वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. सफरचंद हे हिमाचल प्रदेश, काश्मिर या थंड भागात येणार महत्वाच पीक असून ते आता महाराष्ट्रात घेतले जात आहे.
E-Peak Inspection । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी सवलतींसाठी ई-पीक पाहणी अनिवार्य
इतकेच नाही तर सुशिक्षित तरुण सध्या शेतीकडे वळले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक गोष्टी शक्य केल्या जात आहे. त्यामुळे नवनवीन पिकांची लागवड करत चांगली कमाई होऊ लागली आहे. अशाच एका इंजिनिअर तरुणाने काश्मीर या थंड प्रदेशातील सफरचंद या फळाची सातारा (Apple cultivation in Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात यशस्वी लागवड केली आहे.
Sugarcane FRP । एफआरपी कितीही वाढवला तरी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार
साताऱ्यात सफरचंदाची यशस्वी शेती
अनिल दुधाणे (Anil Dudhane) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील खिंगर या गावात सफरचंदाची लागवड करून दाखवली आहे. अनिल दुधाणे हे उच्चशिक्षित आहेत. त्यांनी इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण घेतले असून त्यांना शेतीमध्ये आवड असल्याने त्यांनी शेतीमध्ये काही नवीन करण्याचे ठरवले.त्यांनी त्यातूनच सफरचंद लागवड करण्याचा निर्णय घेतला.
Drought Condition । सरकार दुष्काळ निवारणीसाठी उचलणार ठोस पाऊल, अजितदादांचे आश्वासन
असे केले नियोजन
दरम्यान, सफरचंद लागवड करण्यासाठी त्यांनी हिमाचल प्रदेश या राज्यातून जातिवंत सफरचंदाची रोपे आणली. यात त्यांनी सोनेरी, रेड डेलिशिअस, लाल अंबरी, मॉकीटोश व हार्मोन-९९ या जातींची वीस रोपे आणून सर्व रोपांची त्यांनी दोन वर्षांपूर्वी शेतामध्ये लागवड केली. त्यांनी कोणतेही रासायनिक खत कीटकनाशकांचा वापर केला नाही. ठिबकच्या माध्यमातून त्यांनी झाडांना सूक्ष्म अन्नद्रवे दिले.
Jowar Rate । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ज्वारीची आवक वाढताच दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर
सध्या त्यांच्या सर्व जातीच्या सफरचंद झाडांना मोठ्या प्रमाणात सफरचंद लगडली असून हार्मोन-९९ या प्रजातीचे सफरचंद काढणीला आले आहे. सफरचंद सध्या २० झाडांच्या माध्यमातून सुरु केलेली असली तरी त्याचा आपल्याला खूप मोठा आर्थिक होईल, असे दुधाणे सांगतात. ते झाडांना चांगल्या पद्धतीने फळे आली असल्याने आगामी काळात सफरचंदाची बाग वाढवणार आहे.