Intercropping । हमखास भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून उसाची (Sugar cane) ओळख आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड (Cutlivation of Sugar cane) केली जाते. अनेक शेतकरी जास्त उत्पादन मिळवण्यासाठी उसाला अनेक प्रकारचे रासायनिक खते वापरतात. तर काहीजण सेंद्रिय खताचा वापर करून जास्त उत्पादन घेतात. काही शेतकरी उसात काही आंतरपिके (Intercropping in Sugarcane) घेतात.
पण काही आंतरपिके घेतल्याने त्याचा उसाला तोटा सहन करावा लागतो. जर तुम्ही योग्य आंतरपिके घेतली तर त्याचा तुम्हाला दुहेरी फायदा होऊ शकतो. होय, काही अशी आंतरपिके आहेत ज्याचा तुम्हाला दुप्पट फायदा होईल. अनेक शेतकरी उसामध्ये कपाशी, उडीद, मुगासारख्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करतात. यामुळे जमिनीला अनेक प्रकारचे पोषक घटक मिळतात.
दरम्यान, ऊस हे दीर्घ कालावधीचे पीक आहे. त्यामुळे उसात साडेतीन ते चार महिन्यापर्यंत काढणीला तयार होईल अशा प्रकारची आंतरपिके तुम्ही घेऊ शकता. यात पूर्व हंगामी व सुरू हंगामात रुंद सरी पद्धतीने लावलेला ऊस असल्यास तुम्ही सहज आंतरपीक घेऊ शकता. आंतर पिकांमुळे शेतकऱ्यांना दुप्पट उत्पादन मिळू शकते.
Havaman Andaj । ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
घ्या ही आंतरपिके
जर तुम्ही सुरू किंवा पूर्व हंगामी उसामध्ये जर आंतरपीक घेण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही यात कांदा, हरभरा, गहू, कोबी, भुईमूग तसेच बीट यासारखे पिकांचा आंतरपीक म्हणून घेऊ शकता. बरेच शेतकरी मक्यासारखे पीक उसामध्ये आंतरपीक म्हणून घेततात. कारण कांदा, पालेभाज्या, भुईमूग तसेच हरभरा यासारखी आंतरपिके प्रामुख्याने तीन ते चार महिन्यांमध्ये काढणीला येतात.
होईल लाखोंची कमाई
त्यामुळे या तीन ते चार महिन्याच्या कालावधीत या पिकांपासून तुम्हाला क्षेत्रानुसार 50000 पासून ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. तर दुसरे म्हणजे या तीन महिन्यांमध्ये आंतर पिकांचे काढणी झाली तर ऊस पिकाचे पुढे नियोजन उत्तम पद्धतीने करता येते. त्यामुळे जर तुम्हाला दुहेरी उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्ही या पिकांची लागवड करू शकता.