Onion Rate । गेल्यावर्षी सुरुवातीला कांद्याचे दर कोसळले त्यानंतर सरकारने कांद्याची निर्यात बंदी (Onion export ban) केली. सरकारच्या या निर्णयानंतर कांद्याचे आणखी दर (Onion export) कोसळले. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता. निर्णय मागे घेण्यासाठी शेतकरी आंदोलन करत होते. अशातच काल केंद्र सरकारने (Central Govt) कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारने आता ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. इतकेच नाही तर सरकारने बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे घसरलेले कांद्याचे दर (Onion rate today) पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Havaman Andaj । 7 राज्यांमध्ये अवकाळी आणि गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
कांद्याचे वाढले दर
अशातच आता कांदा उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. निर्यात बंदी हटवताच कांद्याचे दर गगनाला (Onion price hike) भिडले आहेत. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात आज वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. रविवारच्या तुलनेत आज बाजारसमितीत कांद्याचे दर प्रतिक्विंटल ६६१ रुपयांनी वाढले असून सध्या कांद्याला २ हजार १०० रुपये बाजारभाव मिळत आहे.
Onion Export । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! सरकारने हटवली कांदा निर्यात बंदी
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ३०० वाहनातून कांद्याची आवक होत असून कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल २ हजार १०१ आणि कमीत कमी १ हजार रुपये दर मिळत आहे. कांद्याचा दर सरासरी १ हजार ८०० रुपये आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. येत्या काळातही कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.