Animal Husbandry । देशात अनेक ठिकाणी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. पशुपालन हा व्यवसाय अनेक शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. अनेकजण शेतीपेक्षा या व्यवसायातून चांगले पैसे कमावतात. जर तुम्हाला पशुपालनाचा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका. पशुपालनाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. (Loan Scheme)
काय आहे योजना?
खास पशुपालकांसाठी नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) मोठी योजना राबवत आहे. जनावरे खरेदी करण्यासाठी आणि डेअरी युनिट सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांचे कर्ज (Loan) देण्यात येत होते. पण आता नवीन योजनेअंतर्गत या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. पशुपालकांना या योजनेअंतर्गत 12 लाख रुपये रक्कम मिळणार आहे. (NABARD Animal Husbandry Loan Scheme)
Dairy Farmers । मोठी बातमी! राज्यातील दूध उत्पादकांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
पूर्वी नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेंतर्गत डेअरी युनिट उभारण्यासाठी मिळणारे अनुदान 25 टक्के होते. ते आता 50 टक्के केले आहे. ज्यामुळे जास्तीतजास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. पशुपालनाला चालना देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. ज्यामुळे डेअरी उद्योगाला गती मिळेल. तसेच पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वयंरोजगार मिळू शकेल.
Cotton Market । कापसाच्या दरात वाढ, किती मिळतोय दर? जाणून घ्या
जाणून घ्या व्याजाची किंमत
या योजनेंतर्गत, कर्जाचा व्याज दर वार्षिक 6.5 टक्के ते 9 टक्के असून कर्ज परतफेड कालावधी 10 वर्षांपर्यंत असतो. योजनेअंतर्गत, अनुसूचित जाती/जमाती अर्जदारांना 33.33 टक्क्यांपर्यंत सबसिडी देण्यात येते आणि इतर अर्जदारांना 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी देण्यात येते. तुम्हीही सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकता.
Lemon Market । लिंबू उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! बारामतीत मिळतोय ३० ते ७६ रुपयांचा भाव
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे पत्त्याचे प्रमाणपत्र
- ओळख पुरावा
- पशुपालन व्यवसाय नियोजन
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्ज नाबार्डच्या वेबसाइटवरून किंवा कोणत्याही नाबार्ड प्रायोजित बँकेत मिळेल.
- अर्ज संबंधित बँकेत जमा करावा लागेल.
Cabinet Meeting । बिग ब्रेकिंग! मंत्रिमंडळ बैठीकीत शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय