Rose Flower Demand । तसे पाहिले तर गुलाबाच्या (Rose Flower) फुलांना वर्षभर चांगलीच मागणी असते. आपल्या जवळच्या व्यक्तींना भेट देण्यासाठी प्रत्येकजण प्रथम गुलाबांचा वापर करतो. अशातच आता व्हॅलेंटाइन डे (Valentine’s Day) च्या पार्श्वभूमीवर गुलाबांच्या फुलांना सोन्याचे दिवस आले आहेत. मागणी जास्त असल्याने गुलाबांच्या फुलांचे दर (Rose Flower Price) देखील वाढले आहेत.
गुलाबांच्या फुलांची वाढली आवक
जळगाव तालुक्यातील शिरसोली, आसोदा, भुसावळातील विविध गावांतून गुलाबांच्या फुलांची आवक होत आहे. जळगाव शहरातील वल्लभदास वालजी व्यापारी संकुलातील फूल बाजारात मागील दोन-तीन दिवस प्रतिदिन सरासरी २५ हजार नग गुलाब फुलांची आवक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, उठाव असल्याने दर देखील टिकून राहिले आहेत. (Rose Flower Rate)
Onion Rate । कांद्याच्या दरात कमालीची घसरण, किलोला मिळतोय 1 ते 8 रुपये दर
शेतकऱ्यांना होतोय खूप फायदा
दरम्यान, किमतीचा विचार केला तर गुलाबाचे दर (Rose rate) नोव्हेंबरमध्ये प्रतिनग दोन ते तीन आणि कमाल पाच रुपये इतके होते. डिसेंबरमध्ये हे दर सरासरी दोन रुपये प्रतिनग असे मिळाले. जानेवारीमध्ये लग्नसराईमुळे दर प्रतिनग तीन ते पाच रुपये काही दिवस मिळाले. परंतु या वेळी आवक खूप कमी होती. शेतकऱ्यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या तोंडावर फुलांची काढणी आणि अन्य व्यवस्थापन केल्याने त्यांना याचा फायदा होत आहे.
Farmers Help । शेतकऱ्याची बैलजोडी गेली चोरीला, सोशल मीडियावर समजताच केली चक्क 80 हजाराची मदत
फेब्रुवारी महिना सुरू होताच तरुणाईला ‘व्हॅलेंटाइन डे’चे वेध लागतात. पण या दिवसाचे सेलिब्रेशन करण्यापूर्वी आठवडाभर विविध दिवस साजरे होतात. व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात ‘रोझ डे’ होते. या सप्ताहात प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळख असणाऱ्या गुलाबाच्या फुलाला जास्त महत्त्व असते. प्रेमाचा हा उत्सव साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज आहे.
Farmer Accident Insurance । मोठी बातमी! अपघात विम्यापोटी 48 कोटींचा निधी मंजूर
किरकोळ बाजारात देखील गुलाबाच्या फुलांचे दर प्रतिनग १३ ते १५ रुपये असून किरकोळ बाजारातील दरही गेल्या काही दिवसांत वधारले आहेत. इतकेच नाही तर लग्नसराईमुळे सध्या गुलाबासह सर्वच फुलांना चांगला भाव मिळत आहे. व्हॅलेंटाइन वीकमुळे गुलाब फुलाच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
Farmer Relief Fund । बिग ब्रेकिंग! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३३२ कोटी रुपये मंजूर