Management Of Lavala Weeds

Management Of Lavala Weeds । शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ पद्धतीने करा ऊसामधील लव्हाळा तणाचे व्यवस्थापन; काही दिवसातच होणार नायनाट

कृषी सल्ला

Management Of Lavala Weeds । ऊस लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात उसाची वाढ मंद गतीने होते. अशा परिस्थितीत तणांच्या वाढीमुळे उसाची वाढ आणि गुणवत्ता कमी होते. तणांचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते. ऊस पिकात अनेक प्रकारचे तण आढळतात. यामध्ये रुंद पानांचे तण, अरुंद पानांचे तण, मोथा तण आणि वेलीचे तण त्याचबरोबर लव्हाळा तण यांचा समावेश होतो.

Animal Husbandry । पशुपालकांनो, ‘या’ 3 म्हशी देतात सर्वात जास्त दूध; जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

सध्या आपल्याकडे अनेक शेतकरी उसाची लागवड करत मात्र उसातील लव्हाळ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. लव्हाळ्याची कितीही खुरपणी केली तरी लव्हाळा पूर्णपणे नष्ट होत नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कायमच चिंतेत असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला उसामधील लव्हाळा तणाचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती सांगणार आहोत. (Management Of Lavala Weeds)

Gardening Tips । घराजवळ लावाल ‘ही’ झाडे तर वाढेल सापांचा धोका; वाचा महत्वाची माहिती

जर तुम्हाला उसातील लव्हाळा तणाचे व्यवस्थापन करायचे असेल तर सर्वप्रथम रासायनिक तणनाशकाची फवारणी व कोळपणी एका आड एक महिन्याच्या अंतराने एक ते दोन वेळा करा असे केल्यास लव्हाळा तणांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमच्या शेतातील काडीकचरा व उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर लव्हाळ्याचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता आहे.

Tomato Pest । अशा प्रकारे करा टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

एकात्मिक तणनियंत्रण पद्धती

एकाद्या जमिनीमध्ये जर पीक नसेल किंवा त्या जमिनीची मशागत देखील केली नसेल तरीही अशा जमिनीमध्ये एका हंगामात लव्हाळ्याचे साधारणतः १० ते ३० दशलक्ष कंद तयार होतात. त्यामुळे या तणाकडे जास्त नुकसानकारक तण म्हणून पाहिले जाते. या तणाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब अत्यंत उपयुक्त ठरतो. यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोलवर नांगरट करावी. त्यामुळे २ ते ३ आठवड्यांत लव्हाळा तणाचे कंद उघडे पडून सुकून नष्ट होतात.

Sitaphal Diseases । सिताफळ काळे का पडतात? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि उपाययोजना

तणनियंत्रण न केल्यास उत्पादनात होईल घट

कोणतेही पीक पहिले तर त्यामधील तण नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. जर आपण योग्य वेळी तणनियंत्रण केले तर आपल्याला उत्पादन चांगले मिळते. तसे उसाच्याबाबतीत देखील आहे. उसमधील तणाचे वेळेवर व्यवस्थापन केले तर त्यामधून चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे ऊस पिकामध्ये तणनियंत्रण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर शेतकऱ्यांनी पीकवाढीच्या सुरुवातीच्या काळात तण नियंत्रण न केल्यास ऊस उत्पादनात प्रति हेक्टरी १७.५ टन एवढी घट येऊ शकते. त्यामुळे तण नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे.

Success Story । इंदापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याने केला लाखोंचा फायदा देणाऱ्या नवीन फळाचा प्रयोग; अशी केली सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *