Jayakwadi Dam

Jayakwadi Dam । शेतकऱ्यांना मोठा फटका! पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही

बातम्या

Jayakwadi Dam । राज्यातील शेतकऱ्यांना यंदा पुन्हा पाणीटंचाईचा (Water shortage) सामना करावा लागत आहे. कारण यंदाही पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली आहे. ऐन पावसाळ्यातच अनेक भागात पाऊस पडला नव्हता. यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न (Water issue in Maharashtra) निर्माण झाला आहे. पावसाअभावी काही ठिकाणी तर पिके जळून गेली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! 2 एकरातून मिळवलं तब्बल 75 लाखांचं उत्पन्न, जाणून घ्या यशोगाथा

शेतकऱ्यांना मोठा धक्का

अशातच आता शेतकऱ्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण जायकवाडी धरणातील पाणीसाठा (Water storage in Jayakwadi Dam) कमी झाला आहे. त्यामुळे डाव्या कालव्यावर पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसात पाण्याची टंचाई आणखी भीषण होऊ शकते. दरम्यान, डाव्या कालव्यावर उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.

Unseasonal Rain । राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मंजूर झाले 2109 कोटी रुपये

यामुळे या पिकांवर मोठे संकट आले आहे. यावर्षी जायकवाडी धरणामध्ये आवश्यक पाणीसाठा झाला नसल्याने सुरुवातीपासून या भागात सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे चित्र तयार झाले होते. जरी जायकवाडी धरणात वरील धरणातून पाणी सोडले असले तरी सद्य:स्थितीत मुबलक पाणीसाठा नसल्याने जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडले जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे.

Farmers Producer Organization । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जैविक निविष्ठा केंद्र सुरु करून मिळवा 1 लाख रुपये

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर या भागातील जास्त सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. यंदा उन्हाळी हंगामातील पिकांना जायकवाडीतून पाणीच मिळणार नाही, त्यामुळे याचा या भागातील उसाला चांगला फटका बसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या तालुक्यामध्ये दोन खासगी साखर कारखाने आहेत.

Online Buffalo Fraud । सावधान! ऑनलाइन म्हैस खरेदी करणे पडले शेतकऱ्याला महागात, पैसे दिले आणि..

शेतकऱ्यांना करावी लागणार कसरत

मागील वर्षी जवळपास दहा हजार हेक्टर उसाची लागवड करण्यात आली होती. यंदाही पाण्याअभावी उसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तर शिल्लक क्षेत्रावरील ऊस जोपासण्यासाठी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांमध्ये कसरत करावी लागेल हे जवळपास निश्चित आहे.

Document Registration । बनावट दस्त नोंदणीसाठी रोखण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल! आता अदृश्य होणार आधार, पॅन, बोटांचे ठसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *