Garlic Price

Garlic Price । लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लसूण दरात झाली मोठी वाढ; पाहा किती मिळतोय दर?

बाजारभाव

Garlic Price । दररोजच्या जेवणात लसणाचा (Garlic) वापर केला जातो. लसणामुळे जेवणाला चांगली चव येते. महत्त्वाचे म्हणजे जगात लसणाच्या व्यापारात चीनची बरोबरी कोणताही देश करू शकत नाही. (Garlic production) आता भारतही चीनला मात देत आहे. भारताचा लसणाचा व्यापार सतत वाढत आहे. अशातच आता लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Garlic farmers) एका आनंदाची बातमी आहे.

Ravikant Tupkar । शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अडचणीत वाढ! पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

लसणाचे वाढले दर

लसणाच्या दरात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Increased prices of garlic) एकेकाळी 150 ते 200 रुपये प्रतिकिलो दराने मिळणारा लसूण आता 400 रुपये प्रतिकिलो दरानं विकला जात आहे.यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी लसणाचे सर्वात जास्त उत्पादन झाले होते. मध्य प्रदेशात देखील लसणाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते.

Onion Harvester । कायमची मिटली मजुरांची कटकट! बाजारात लवकरच उपलब्ध होणार कांदा काढणी यंत्र

पण यंदा शेतकऱ्यांनी लसणाची लागवड (Cultivation of garlic) कमी प्रमाणात केली आहे. यामुळे यंदा कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. याच कारणामुळे लसणाचे भाव वाढले आहेत. लसणाचे नवीन पीक केव्हा येईल, तेव्हा त्याचे उत्पादन जास्त झाले तर भाव कमी होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात लसणाचे भाव वाढणार (Garlic price) की कमी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Success Story । डाळमिलने बदलले महिलेचे आयुष्य; वाचा यशोगाथा

लसणाचे क्षेत्रफळ किती कमी झाले?

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2021-22 या वर्षात देशभरात 4,31,000 हेक्टरमध्ये लसणाची लागवड झाली होती. जे 2022-23 च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार केवळ 3,86,000 हेक्टरवर कमी करण्यात आले. म्हणजे एकाच वर्षात 45,000 हेक्टर क्षेत्र घटले. अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या संतापामुळे या क्षेत्रात 10.4 टक्के घट झाली.

Milk Production । सावधान! आता फॅट काढण्यासाठी जास्त दूध घेणाऱ्या संस्थांवर केली जाणार कारवाई

दरम्यान, जानेवारी 2023 मध्ये बाजारात लसूण केवळ 5 रुपये प्रति किलो या दराने विकला जात होता, तर यावर्षी 200 रुपये प्रति किलो दराने लसूण विकला जात होता. रिटेलमध्ये ग्राहकांना 400 रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. जर हे दर असेच वाढत राहिले तर सर्वसामान्यांच्या ताटातून लसूण गायब होऊ शकतो.

Cow Farming । काय सांगता! एका वेतात ‘ही’ गाय देते तब्बल 3,000 लिटर दूध, जाणून घ्या या गाईची वैशिष्ट्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *