Gardening Tips

Gardening Tips । घराजवळ लावाल ‘ही’ झाडे तर वाढेल सापांचा धोका; वाचा महत्वाची माहिती

बातम्या

Gardening Tips । आपलेही छोटेसे का होईना परंतु घर असावे अशी जवळपास सर्वांची इच्छा असते. काहीजण नवीन घर खरेदी करतात तर काहीजण घर नव्याने बांधतात. नवीन घरासाठी ते दिवसरात्र कष्ट करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. नवीन घर उत्तम प्रकारे सजवायला अनेकांना आवडते. त्यासाठी घराभोवती किंवा गच्चीवर शोभेची झाडे, आकर्षक फुलझाडे यांसारखी झाडे लावली जातात. नवीन घराभोवती चांगले वातावरण तयार व्हावे अशी त्यांची इच्छा असते.

Success Story । इंदापूर तालुक्यातील युवा शेतकऱ्याने केला लाखोंचा फायदा देणाऱ्या नवीन फळाचा प्रयोग; अशी केली सुरुवात

परंतु काही झाडे चुकूनही लावू नका. कारण या सुवासिक झाडांमुळे साप येण्याची दाट शक्यता असते. प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसात घराच्या परिसरात साप येऊ शकतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण या झाडांच्या मदतीने सापांना आमंत्रण देतो. यामुळे जीवितहानी देखील होऊ शकते. जर तुम्हाला हा धोका टाळायचा असेल चुकूनही काही झाडे तुमच्या अंगणात लावू नका.

Desi Jugad । शेतकरी बापाने मुलासाठी केले भन्नाट जुगाड; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

मोगरा

मोगऱ्याचे झाड खूप दाट असून या झाडाच्या रंगांत साप स्वतःला लपवू शकतो. जर तुमचा चुकून त्याला धक्का लागला तर सर्पदंश होण्याची शक्यता जास्त असते. याच कारणामुळे घराजवळ मोगऱ्याचे झाड लावण्याचे टाळा.

देवदार

देवदार हे उंच वाढणारे झाड आहे. उंच ठिकाणी हे झाड चांगल्या प्रकारे वाढते. काहीजण सपाट परिसरात ही झाडे लावतात. चंदनाच्या झाडाप्रमाणे देवदाराच्या झाडात साप स्वतःला लपवून ठेवू शकतात. त्यामुळे अशी झाडे चुकूनही लावू नये.

लिंबाचे झाड

अनेकवेळा लिंबाचे झाड लावले जाते. यावर अनेक लहान कीटक आणि पक्षी राहतात. त्यामुळे अशा ठिकाणी साप आढळून येतात. त्यामुळे घराजवळ लिंबाचे झाड लावू नका.

Tomato Pest । अशा प्रकारे करा टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

सायप्रेस

घराजवळ मोठा घेर असणारी झाडे अनेकांना लावायला आवडतात. याच पद्धतीची सायप्रेस एक वनस्पती आहे. शोभेची वनस्पती अशी तिची ओळख आहे. ती दिसायाला खूप आकर्षित आणि दाट असते. या झाडावर साप लपण्याची शक्यता असल्याने हे झाड लावू नका, नाहीतर त्याचा तुम्हाला फटका बसेल.

Sitaphal Diseases । सिताफळ काळे का पडतात? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि उपाययोजना

जाई

खरंतर जाईची फुलं ही सुवासिक आणि खूप आकर्षक असतात. परंतु याच वासामुळे सापाचा धोका वाढत जातो. त्यामुळे हे झाड घरात किंवा परिसरात लावू नये.

पारिजातक

पारिजातकाचा वापर अनेक आजारांवर उपचार म्हणून करतात. हे झाड खूप सुवासिक असते. त्याची लागवड केल्याने घरात साप येऊ शकतात. त्यामुळे हे झाड लावू नका.

Maharastra Rain । ‘या’ जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती अतिशय भयंकर; जास्त किमतीने खरेदी करावा लागतोय हिरवा चारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *