Wild Animal । काही भागात जंगली प्राण्यांमुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी (Wild Animal Damage) होते, अनेकदा हातातोंडाशी आलेला घास हे जंगली प्राणी हिरावून घेतात. त्यामुळे शेतकरीवर्ग निराश होतात. पिकांची नासाडी (Crop damage) होऊ नये म्हणून शेतकरी विविध उपाय करतात. तरीही जंगली प्राण्यांची नासाडी सुरूच असते. जर तुम्हीही जंगली प्राण्यांना वैतागला असाल तर काळजी करू नका. तुम्ही हा उपाय करून पहा. (Crop damage due to animal)
Havaman Andaj | महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; जाणून घ्या कुठे कोसळणार पाऊस?
तुम्ही आता घरगुती पद्धतीने उपाय करून या संकटांवर मात मिळवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही. तुम्ही घरच्या घरी जंगली प्राण्यांना पळवून लावणारे जैविक औषध (Biological medicine) बनवू शकता. या औषधामुळे जंगली प्राण्यांची धुडगूस थांबेल.
अशापद्धतीने तयार करा जैविक औषध
यासाठी तुम्हाला ५ लिटर गोमुत्राची गरज पडणार आहे. त्यानंतर एक किलो शेण, अडीच किलो कडुनिंबाच्या झाडाचा पाला, अडीच किलो बकानाच्या झाडाचा पाला, एक किलो धोतरा, एक किलो रुईची पाने, 250 ग्रॅम लाल मिरची, 250 ग्रॅम सुरती अर्थात तंबाखूची पाने, 250 ग्रॅम लसूण या सर्व वस्तूंचे एकत्रिपणे चांगले मिश्रण करून घ्यावे. (Biological medicine for crop)
या सर्व वस्तू चांगल्या मिक्स कराव्या. जुनी काही मातीची भांडी असल्यास त्यात हे मिक्स केलेले मिश्रण 25 दिवस ठेवावे लागेल. या मातीच्या भांड्याचे तोंड चांगले घट्ट बांधून घ्या. हे लक्षात घ्या की तुम्हाला या भांड्याचा एक तृतीयांश हिस्सा हा मोकळा ठेवावा लागेल. कारण विखंडणाच्या प्रक्रियेमुळे कार्बन गॅसची निर्मिती होऊन हे मातीचे भांडे फुटण्याची शक्यता जास्त असते.
२५ दिवसात तयार होते औषध
२५ दिवसानंतर हे औषध पूर्णपणे तयार झाल्यानंतर, या मातीच्या भांड्याचे तोंड मोकळे करावे. २५ दिवसानंतर एक उग्र वास असणारे जैविक औषध तयार होते. हे मिश्रण एकरासाठीचे असून यातील निम्मे औषध 100 लिटर पाण्यात मिसळून, त्यात 250 ग्राम धुण्याचा सोडा वापरून बिघाभर शेतासाठी फवारणी करा. ही फवारणी केल्यानंतर कोणतेही जंगली प्राणी तुमच्या शेताजवळ येणार नाहीत.
Process Of Sugar Production । ऊसापासून साखर कशी बनवली जाते? वाचा A To Z माहिती