Chemical Pesticides । शेतीमध्ये चांगले उत्पादन घ्यायचं असेल तर पिकांचे संरक्षण करणे ही शेतकऱ्यांची मोठी जबाबदारी असते. पिकाचा नाश करणाऱ्या किडींचा प्रतिबंध होण्यास मदत होते आणि झाडांच्या संरक्षणासाठी कीड नियंत्रण खूप गरजेची आहे. कीड नियंत्रणासाठी जळपास सर्व शेतकरी कीटकनाशकांची (Pesticides) फवारणी करतात.
Dairy Industry । दूध व्यवसायामुळे लागला संसाराला आर्थिक हातभार, कसं केलं नियोजन? जाणून घ्या..
जर तुम्हीही कीटकनाशकांची (Insecticide)फवारणी करत असाल तर योग्य ती काळजी घ्यावी लागते. कारण अलीकडच्या काळात कीटकनाशकांची फवारणी करताना काही शेतकऱ्यांना त्यांच्या काही चुकांमुळे जीव गमवावा लागला आहे. जर तुम्हीही काही चुका करत असाल तर त्या आजच टाळा. नाहीतर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागेल. (Chemical Pesticides precaution)
लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
- शेतकऱ्यांनी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्यापूर्वी तोंडाला मास्क, हातात ग्लोव्हज आणि पायात बूट घालावे
- कीटकनाशकांची फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी, ज्यामुळे फवारणी फवारणी यंत्रावर पडणार नाही.
- नोझल पिकांपेक्षा कमी उंचीवर ठेवून फवारणी करावी. असे केल्याने रसायन हवेत पसरणार नाही.
- कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर आंघोळ करावी, ज्यामुळे रसायनांचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही.
- तसेच कीटकनाशक फवारणीसाठी लागणारी उपकरणे पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ करणे गरजेचे आहे.
- कीटकनाशक लहान मुलांच्या संपर्कात येऊ देऊ नका.
- कीटकनाशक मिश्रण हाताने न ढवळता एका काठीने ढवळा.
Fish Food । तांदूळ माशांना खायला देता येते का? जाणून घ्या माशांच्या अन्नाबद्दल सविस्तर माहिती
कीटकनाशकाच्या संपर्कात आल्यास काय करावे?
- अनेकवेळा फवारणी केल्यानंतर कीटकनाशक चुकून तोंडात, डोळ्यात किंवा नाकात जाते. अशा वेळी एक ग्लास कोमट पाण्यात मीठ मिसळून कुस्करून उलटी करावी.
- कीटकनाशकाचा वास आल्यास, मोकळ्या हवेत फिरून अंगावरील कपडे सैल करा, जेणेकरून तुम्हाला गुदमरणार नाही. इतकेच नाही तर सुगंधी वास घेतला तरीही आराम मिळेल.
- कीटकनाशकांच्या फवारणीनंतर आरोग्याशी निगडित कोणतीही समस्या दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
- श्वास घेण्यास त्रास होत असल्यास पोटावर झोपावे आणि हात समोर पसरवावे.