Poultry business । अनेकजण लाखो रुपयांची नोकरी सोडून व्यवसाय (Business) सुरु करत आहेत. या व्यवसायातून त्यांना लाखो रुपयांची कमाई देखील करता येत आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. अनेकजण कुक्कुटपालन (Poultry) व्यवसाय सुरु करतात, विशेष म्हणजे या व्यवसायात जास्त जागा आणि जास्त पैशांची गरज लागत नाही.
Seed Subsidy । आनंदाची बातमी! आता उन्हाळी हंगामात अनुदानावर मिळणार भुईमूग बियाणे
कुक्कुटपालन व्यवसाय
तुम्ही कमी पैशात लाखो रुपयांची कमाई करू शकता. तुम्ही हा व्यवसाय प्रशिक्षण घेऊन सुरु करू शकता. नाशिक कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत आणि मालेगाव कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मालेगाव, बागलाण आदी तालुक्यात परसबागेतील कुक्कुटपालन आणि व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत. (Poultry Business Income)
शेतकऱ्यांचा देखील याला प्रतिसाद मिळत आहे. परसातील कुक्कुटपालनामध्ये मुळ गावरान किंवा देशी कोंबड्यांचा संगोपनासाठी समावेश होतो. पारंपरिक परसातील कुक्कुटपालनात 15 ते 20 कोंबड्यांचे मुक्त पद्धतीने संगोपन करण्यात येते. या परसबागेमध्ये कोंबड्या दिवसभर मोकळ्या सोडल्या जातात. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून कोंबड्यांसाठी खुराडे तयार करण्यात येतात.
Crop Disease । गव्हावर किडीचा प्रादुर्भाव वाढलाय? असे मिळवा नियंत्रण
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोंबड्यांच्या संगोपनासाठी सर्वात कमी येत असल्याने अनेकांसाठी हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे. यावर्षी कृषी विज्ञान केंद्राने बारामती येथे विकसित करण्यात आलेल्या कावेरी जातीची निवड केली आहे. या ठिकणाहून एका दिवसाचे पिल्लू आणून कृषी विज्ञान केंद्रामार्फत संगोपन करण्यात येते. त्यानंतर एक महिन्याच्या वाढीनंतर ते लाभार्थ्यांना देण्यात येते.
Government Schemes । क्या बात है! शेतकऱ्यांना मिळणार एकरी 37500 रुपये, कसं ते जाणून घ्या
होईल जास्त फायदा
जर तुम्हाला कमी खर्चात जास्त उत्पन्न (Income from Poultry) मिळवायचे असेल तर हा व्यवसाय सुरु करा. तुम्हाला याचा खूप फायदा होईल. विशेष म्हणजे संपूर्ण वर्षभर या व्यवसायाला प्रचंड मागणी असते. या व्यवसायामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना रोजगार निर्माण होत आहे. त्यामुळे हा व्यवसाय खूप फायद्याचा आहे. आजच या व्यवसायाची सुरुवात करा.